दत्त जयंतीसाठी पुरणपोळी हा एक आवडीचा आणि पारंपरिक नैवेद्य आहे, पण याशिवाय दत्त महाराजांना मोदक, कडबोळी, बेसन लाडू, पेढे, आणि वालाच्या घेवड्याची भाजी असे सात्विक पदार्थही आवडतात. हे पदार्थ बनवताना स्वच्छता आणि सात्विकतेचे पालन करणे महत्त्वाचे आहे. पुरणपोळी हा महाराष्ट्रातील एक पारंपरिक आणि आवडीचा नैवेद्य आहे, जो सणांमध्ये देवाला अर्पण केला जातो.
साहित्य
- १ कप चणाडाळ
- १ कप किसलेला गूळ
- १ कप मैदा
- ७-८ लहान चमचे तेल
- १ चमचा वेलची पावडर
- पाव किलो मैदा
कृती
- चणाडाळ स्वच्छ धुऊन ३ तास भिजत ठेवा. नंतर कुकरमध्ये डाळ, पाणी, हळद, मीठ आणि थोडे तेल टाकून डाळ मऊ होईपर्यंत शिजवा.
- शिजवलेली डाळ घट्ट झाल्यावर शिजवलेली डाळ आणि गूळ एकत्र शिजवा. गूळ आणि चणाडाळ आटू लागले की मध्ये मध्ये ढवळत राहावे अन्यथा खाली भांड्याला लागून करपू शकते.
- नंतर त्यात वेलची आणि जायफळ पूड घालून पुरण घट्ट होईपर्यंत शिजवून घ्या.
- मैद्याच्या पिठाची पारी करून त्यात पुरणाचे सारण भरा आणि पोळी लाटा.
- लाटलेली पोळी गरम तव्यावर दोन्ही बाजूंनी तुपावर सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)












