मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला दत्त जयंती साजरी केली जाते. दत्त जयंती हा भगवान दत्तात्रेयांचा जन्मदिवस आहे, जे त्रिमूर्तीचे (ब्रह्मा, विष्णू, महेश) अवतार मानले जातात. या दिवशी भक्त पहाटे पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात, उपवास करतात आणि दत्ताच्या मूर्तीची किंवा पादुकांची पूजा करतात. सायंकाळी दत्ताचा पाळणा हलवला जातो. यावेळी पाळणा गीत गायली जातात.
दत्तजयंती कशी साजरी करतात
- भक्त पहाटे पवित्र नद्यांमध्ये किंवा ओढ्यांमध्ये स्नान करतात.
- या दिवशी भक्त उपवास ठेवतात आणि फुले, धूप, दिवे आणि कापूर वापरून दत्तात्रेयांची पूजा करतात.
- दत्तजयंतीच्या दिवशी भक्त श्रीदत्त अथर्वशीर्ष आणि इतर स्तोत्रे, आरत्यांचे पठण करतात. अनेक भक्त ‘गुरुचरित्राचे’ पारायणही करतात.
- काही ठिकाणी दत्त महाराजांचा पाळणा हलवला जातो आणि संध्याकाळी जन्माची कीर्तने केली जातात.
- काही भक्त दत्तजयंतीपूर्वी दत्त परिक्रमा पूर्ण करतात.
दत्त जयंती पाळणा गीत
पहिला दिवस पहिला दिवस ब्रह्मा विष्णू आणि महेश खास
अनुसुयापोटी आले जन्मास, जो बाळा जो जो रे जो!

दुसऱ्या दिवशी झाला आनंद, नाचू लागले मुनी नारद,
चंदन बुका लावी गंध, दत्त बाळाचे चरण वंदीन
तिसऱ्या दिवशी आनंद मोठा, स्वर्ग कैलासी वाजली घंटा,
पाची अमृत सोन्याच्या ताटा, नगरजनांसी सुंठोडा वाटा
चौथ्या दिवशी चंद्रपूजेचा प्रकाश पडला महाली,
सूर्याचा नवलक्ष तारे प्रकाश, चंद्राचा जसा झळकतो हिरा रत्नाचा,जो बाळा जो जो रे जो!
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)











