Wedding Rituals : वधू गृहप्रवेशावेळी तांदळाने भरलेलं माप का ओलांडते? या परंपरेचे महत्त्व काय? जाणून घ्या..

लग्नानंतर नवीन सुनेच्या गृहप्रवेशाच्या वेळी तांदळाने भरलेले माप का ओलांडते? जाणून घ्या याविधीमागील कारण...

हिंदू धर्मात नववधूचं स्वागत सासरी आणि नवीन घरात मोठ्या थाट्या माट्यात केलं जातं. हे स्वागत करताना काही विधीही देखील केले जातात. लग्नातील प्रत्येक विधीमागे काही ना काही कारणं असतात. त्यातील एक विधी असा आहे जी वधूच्या गृहप्रवेशाशी जोडला गेलाय. हिंदू धर्मात वधूने गृहप्रवेश करताना नवीन घरात प्रवेश करताना तांदळानं भरलेलं माप उजव्या पायानं ओलांडायचं असतं. पण का यामागील कारणं  जाणून घेऊयात….

नवीन सुनेचा गृहप्रवेश सोहळा का खास असतो?

नवीन सुनेचा गृहप्रवेश सोहळा खास असतो कारण तो एका नवीन आयुष्याची सुरुवात दर्शवतो. यात केवळ नवीन घरात प्रवेशच नव्हे, तर घरात लक्ष्मीचे आगमन आणि सकारात्मक ऊर्जा आणण्याचे प्रतीक म्हणूनही हा सोहळा महत्त्वाचा मानला जातो. या सोहळ्यामुळे कुटुंबातील नातेसंबंध अधिक घट्ट होतात आणि नवीन घरात आनंदी व समृद्धीचे स्वागत होते. 

वधू गृहप्रवेशावेळी तांदळाने भरलेलं माप का ओलांडते?

धार्मिक मान्यतेनुसार, लग्नानंतर घरात येणाऱ्या नव्या नवरीला साक्षात देवी लक्ष्मीचं रुप मानलं जातं. असं म्हणतात की, तिच्या स्वागतासाठी दारात ठेवलेल्या कलशातील तांदूळ तिच्या पावलांनी घरात विखुरले की, तिचं सासर सदैव सुख, समृद्धीनं संपन्न राहतं. त्यामुळेच लग्नानंतर हा महत्त्वाचा विधी पार पाडला जातो.  हा विधी तिच्या सासरच्या घरात तिच्या स्वागतासाठी केला जातो. यातून नवरीच्या नवीन प्रवासाची सुरुवात शुभ आणि समृद्धीत व्हावी हा उद्देश असतो. 

वधू गृहप्रवेश करताना तांदळाने भरलेले माप उजव्या पायाच्या अंगठ्याने हळूच ओलांडते. हे प्रतीक आहे की ज्या घरात नवीन वधू प्रवेश करते, तिथे कधीही धन-संपत्ती आणि आनंदाची कमतरता भासणार नाही.

वधू ही देवी लक्ष्मीचे प्रतीक आहे

वधू ही देवी लक्ष्मीचे प्रतीक आहे कारण तिच्या आगमनाने घरात सुख-समृद्धी आणि संपन्नता येते. लग्न होऊन सासरी येणारी वधू ही केवळ नवीन व्यक्ती नसते, तर ती घरात लक्ष्मीप्रमाणे प्रवेश करते असे मानले जाते. यामुळे घरात कधीही संपत्ती, अन्न आणि आनंदाची कमतरता भासत नाही. या श्रद्धेचे प्रतीक म्हणून लग्नानंतर गृहप्रवेशाच्या वेळी वधू तांदळाचे माप ओलांडते.

तांदळाने भरलेले माप ओलांडण्याच्या परंपरेचे महत्त्व काय?

वधू ही देवी लक्ष्मीचे प्रतीक आहे, म्हणून तिला घरात स्वागत करताना तांदळाने भरलेले माप ओलांडण्याच्या परंपरेचे महत्त्व असे आहे की, ती घरात समृद्धी आणि संपन्नता घेऊन येत आहे. या विधीमुळे घरात लक्ष्मीचा प्रवेश होतो, हे दर्शविले जाते, ज्यामुळे कुटुंबाला धन, सुख आणि भरभराट लाभते. तांदूळ संपन्नतेचे प्रतीक आहे. वधू जेव्हा हे तांदळाने भरलेले माप तिच्या उजव्या पायाने ओलांडते, तेव्हा ती घरात धन आणि समृद्धी घेऊन येत असल्याचे हे एक शुभ चिन्ह मानले जाते.  जरी सामान्य परिस्थितीत अन्नाला पायाने स्पर्श करणे अशुभ मानले जात असले तरी, या विशेष प्रसंगी हा विधी शुभ आणि महत्त्वाचा मानला जातो. 

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News