एकादशीच्या उपवासाचे पदार्थ म्हणून वरईला महत्वाचे स्थान आहे. फायबर समृद्ध वरईपासून तुम्ही उपवासाला वेगवेगळे पदार्थ बनवू शकतात. आम्ही खास रेसिपी घेऊन आलो आहोत वरईच्या तांदळाचा भात. चला तर मग जाणून घेऊया वरईच्या तांदळाचा भात कसा बनवायचा …
साहित्य
- वरीचा तांदूळ
- तूप
- जिरे
- दोन- तीन मिरच्यांचे तुकडे
- आले
- साखर
- मीठ
- शेंगदाण्याचे कूट
- बेदाणे
- कोथिंबीर
- काजूचे तुकडे
कृती
- वरीचे तांदूळ धुवून ठेवावेत. एका मोठय़ा भांडय़ात तूप गरम करून त्यात जिरे, मिरचीचे तुकडे घालावेत.
- वरी तांदूळ घालून अंदाजे पाणी घालावे. त्यात बटाटयाच्या फोडी घालाव्यात. शेंगदाण्याचे कूट, मीठ आणि साखर घालून शिजवून घ्यावे.
- दुसऱ्या पॅनमध्ये थोडे तूप घालून काजू आणि बेदाणे परतून घ्यावेत. हे त्या वरीवर घालून छान मिसळून घ्यावे. कोथिंबीर घालून छान वाफ द्यावी.












