Diwali 2025 : यंदाच्या दिवाळीत घरी आलेल्या पाहुण्यांसाठी झटपट बनवा ‘ऑरेंज मॉकटेल’ पाहा रेसिपी!

Asavari Khedekar Burumbadkar

दिवाळी सण म्हणजे आनंद, उत्साहाचा, जल्लोषाचा. अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेचजण दिवाळी उत्साहात साजरी करतात. दिवाळी या सणानिमित्त फटाके फोडणे, नातेवाईक आणि शेजाऱ्यांसोबत मजा करणे, विविध मिठाई आणि पदार्थांचा आस्वाद घेणे, गोड धोड खाणे हे सुरुच असते. दिवाळीच्या सणानिमित्त आपण आपल्या प्रिजनांच्या भेटीगाठी घेतो. यंदाच्या दिवाळीत घरी येणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी तुम्ही थंड पेय बनवू शकता. थंड पेयांच्या सेवनामुळे शरीराला अनेक फायदे होतील….

ऑरेंज मॉकटेल

साहित्य

  • २ कप ताज्या संत्र्याचा रस
  • १/२ कप लिंबाचा रस
  • १/४ कप साखर किंवा चवीनुसार मध
  • थंड पाणी
  • बर्फाचे तुकडे
  • संत्र्याची फोड आणि पुदिन्याची पाने 

कृती

  • एका मोठ्या भांड्यात संत्र्याचा रस आणि लिंबाचा रस एकत्र करा.
  • त्यात साखर किंवा मध घालून ते विरघळेपर्यंत चांगले मिसळा.
  • आता त्यात थंड पाणी घालून पुन्हा एकदा ढवळा.
  • ग्लासमध्ये बर्फाचे तुकडे टाका आणि तयार केलेले मॉकटेल त्यात ओता.
  • सजावटीसाठी संत्र्याची फोड आणि पुदिन्याची पाने वापरा.
  • थंडगार सर्व्ह करा. 

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)

ताज्या बातम्या