Dhantrayodashi 2025 : धनत्रयोदशीला दाखवा बेसन बर्फीचा खास नैवेद्य, एकदम सोपी रेसिपी

Asavari Khedekar Burumbadkar

धनत्रयोदशी या दिवशी भगवान धन्वंतरी, देवी लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांची पूजा आवर्जून केली जाते. ही पूजा केल्यानंतर त्यांना खास नैवेद्य दाखवला जातो. आज या धनत्रयोदशीच्या पूजेसाठी तुम्ही देखील नैवेद्य दाखवा. त्यासाठी अनेक प्रकारचे पदार्थ बनवले जातात. असे मानले जाते की या दिवशी जर आपण शुद्ध मनाने आणि घरगुती गोड पदार्थांचा नैवेद्य अर्पण केला, तर घरात लक्ष्मीचा वास होतो आणि वर्षभर धनसंपत्तीची वाढ होते. म्हणूनच आज आपण जाणून घेऊया एक खास रेसिपी सोपी आणि अतिशय स्वादिष्ट बेसन बर्फी…

साहित्य

  • 1 वाटी- बेसन
  • 1 वाटी- साखर
  • 1 वाटी- देशी तूप
  • अर्धी वाटी- मावा
  • 4 चमचे- दूध
  • 1 टीस्पून- वेलची पावडर
  • काजू, बदाम किंवा पिस्त्यासारखे ड्रायफ्रुट्स (ऐच्छिक)

कृती

  • एका जाड बुडाच्या कढईत तूप गरम करून त्यात बेसन घाला आणि मंद आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत आणि छान सुगंध येईपर्यंत भाजून घ्या. जर तुम्हाला रवा वापरायचा असेल तर तोही तुपात भाजून घ्या.
  • भाजल्यानंतर बेसनाचा रंग बदलला त्यात मावा घाला. गॅस बंद करा आणि  बेसन थोडं थंड होऊ द्या.
  • दुसऱ्या भांड्यात साखर थोडे पाणी आणि वेलची पूड घालून एकतारी पाक तयार करा. पाक घट्ट झाल्यावर गॅस बंद करा.
  • भाजलेले बेसन आणि साखरेचा पाक एकत्र करून चांगले मिसळा.
  • तुपाचा हात लावलेल्या ट्रेमध्ये हे मिश्रण ओतून थोडं घट्टसर पसरवा. वरून सुकामेव्याचे काप पसरा.
  • मिश्रण सेट होऊ द्या. सेट झाल्यावर चाकूने बर्फीचे चौकोनी किंवा आयताकृती तुकडे करा आणि सर्व्ह करा. 

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)

ताज्या बातम्या