दिवाळी म्हटलं की सर्वात आधी सर्वांच्या घरात सुरु होते ते म्हणजे साफसफाई. दिवाळी हा सण भरपूर सकारात्मकता घेऊन येतो. त्यामुळे देवी लक्ष्मीचे मनोभावे आगमन करण्यासाठी घरातील साफ-सफाई गरजेची असते. असे मानले जाते की ज्या घरात स्वच्छता चांगली असते तिथे देवी लक्ष्मी वास करते. त्यामुळे दिवाळीत प्रत्येकजण घराची साफसफाई करतो. दिवाळीच्या दिवशी देवी लक्ष्मीला स्वच्छता खूप आवडते आणि ती तिथेच राहते जिथे स्वच्छता असते. पण ही साफसफाई करत असताना जर ‘या’ वस्तू तुम्हाला मिळाल्या तर नक्कीच तुमच्यासाठी हे शुभ संकेत असल्याचं म्हटलं जातं. कोणत्या आहेत त्या गोष्टी जाणून घेऊयात…
मोरपंख
हिंदू धर्मात मोराचे पंख खूप पवित्र आणि शुभ मानले जातात. मोरपंख घरात सापडणे हे शांतता आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार, मोरपंख घरात सकारात्मक ऊर्जा आणतात आणि घरात समृद्धी, शांती आणि आरोग्य वाढवतात, असे मानले जाते.
शंख
स्वच्छता करताना शंख सापडणे देखील शुभ मानले जाते. या आहेत माता लक्ष्मीच्या आवडत्या गोष्टी. या सापडल्यामुळे संपत्ती मिळण्याची दाट शक्यता निर्माण होते. मानले जाते. हे तुमच्यावर देवाच्या आशीर्वादाचे लक्षण आहे. म्हणजे तुमच्या आयुष्यात लवकरच काहीतरी चांगले घडणार आहे. शंख हे शुभ मानले जाते कारण ते घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणते. शंख हे भगवान विष्णूंचे आवडते वाद्य आहे. सापडलेल शंख गंगाजलाने शुद्ध करा, ते तुमच्या पूजास्थळावर ठेवा आणि दिवाळीला त्याची पूजा करा.
जुना तांदूळ सापडणे
दिवाळीच्या साफसफाईत जुने तांदूळ सापडल्यास ते आई लक्ष्मीचा आशीर्वाद मानला जातो. दिवाळीच्या साफसफाईत जुना तांदूळ सापडणे हे देवी लक्ष्मीच्या कृपेचे एक शुभ लक्षण मानले जाते, जे आर्थिक समृद्धी आणि समृद्धीचे संकेत देते. हे घरात सकारात्मकता येण्याचे आणि आर्थिक संकट दूर होण्याचे प्रतीक आहे. जुना तांदूळ सापडणे म्हणजे लक्ष्मीची कृपा तुमच्यावर आहे. यामुळे घरात समृद्धी आणि भरभराट येण्याची शक्यता असते.
लाल कपडा
दिवाळीच्या साफसफाईत घरात कोरा लाल कापड मिळणे हे एक शुभ लक्षण मानले जाते, जे तुमच्या आयुष्यातील सुवर्णकाळाची सुरुवात दर्शवते. ज्योतिषशास्त्रानुसार, यामुळे घरात समृद्धी आणि कुटुंबासाठी शुभ कालावधी येतो असे मानले जाते. साफसफाई करताना लाल कापड सापडणे हे देवी लक्ष्मीच्या कृपेचे आणि घरात सुख-समृद्धीचे लक्षण आहे. हे संकेत देतात की तुमच्या आयुष्यात एक चांगला काळ सुरू होणार आहे.
अचानक पैसे मिळणे
दिवाळीच्या साफसफाईच्या वेळी अचानक घराच्या कोपऱ्यात नोटा किंवा नाणी दिसली, जी तुम्ही ठेवल्याची तुम्हाला आठवत नसेल. तर ते खूप शुभ आहे. हे सूचित करते की तुमचे आर्थिक व्यवहार लवकरच सुटतील आणि तुमचे अडकलेले पैसे मिळू शकतात. ते पैसे शक्यतो खर्च न करता स्वच्छ पुसून मंदिरात ठेवा तसेच त्यातील काही पैसे हे लाल कापडात गुंडाळून तुमच्या तिजोरीत किंवा कपाटात सुरक्षित ठेवा. असे केल्याने संपत्ती वाढते असे म्हटले जाते.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)












