दिवाळी सणाला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. दिवाळीमध्ये सगळ्यांच्या घरी फराळ बनवण्याची, खरेदीची, साफसफाई करण्याची मोठी घाई असते. या दिवसांमध्ये घरात आनंदी वातावरणात असते. दिवाळीमध्ये फराळाच्या ताटात वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. त्यात चकली, लाडू, करंज्या, शेव इत्यादी अनेक गोड पदार्थ बनवले जातात. तसेच पाहुण्यांच्या घरी गोड पदार्थ, भेट वस्तू, ड्रायफ्रुटस इत्यादी पदार्थ नेले जातात. दिवाळीमध्ये पाहुण्यांकडे जातात तुम्ही स्वतःच्या हाताने बनवलेली अक्रोड खजूरची शुगर फ्री बर्फी घेऊन जाऊ शकता. हा पदार्थ बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. चला तर जाणून घेऊया अक्रोड खजुराची शुगर फ्री बर्फी बनवण्याची सोपी रेसिपी..
साहित्य
- अक्रोड
- खजूर
- तूप
- खवा
- सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्या
कृती
- अक्रोड खजुरची बर्फी बनवण्यासाठी सर्वप्रथम पॅन गरम करून त्यात अक्रोड भाजून घ्या. भाजून घेतलेले अक्रोड थंड करण्यासाठी ठेवा.
- भाजून घेतलेले अक्रोड थंड करून सुरीच्या साहाय्याने बारीक करून घ्या.
- कढईमध्ये तूप गरम करून त्यात बिया काढून घेतलेले खजूर मंद आचेवर व्यवस्थित भाजून घ्या.
- त्यानंतर कढईमध्ये तूप टाकून त्यात पुन्हा एकदा अक्रोड भाजा.
- भाजून घेतलेल्या अक्रोडांमध्ये खजूर आणि खवा टाकून व्यवस्थित भाजून घ्या. 5 ते 10 मिनिटं व्यवस्थित शिजल्यानंतर गॅस बंद करा.
- ताटाला तूप लावून त्यात तयार केलेले मिश्रण ओता आणि सगळीकडे पसरवून घ्या. त्यानंतर थंड झाल्यावर तुम्हाला हव्या त्या आकाराच्या बर्फी कापून घ्या.
- तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली अक्रोड खजुराची शुगर फ्री बर्फी. सजावटीसाठी सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्या वापरा.












