दिवाळी हा सण दरवर्षी मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. पाच दिवस चालणारा उत्सव धनत्रयोदशीपासून सुरू होतो आणि भाऊबीजच्या दिवशी संपतो. यावेळी बाजारातून मिठाई आणण्याऐवजी घरीच काही साध्या सोप्या रेसिपी ट्राय करू शकता. चॉकलेट बर्फी ही बर्फी बनवण्यासाठी खूप कमी साहित्य लागते आणि ती कमी वेळात तयार होते, त्यामुळे दिवाळीच्या सणासुदीला हा एक चांगला पर्याय आहे.
साहित्य
- पिस्त्याची पावडर
- कोको पावडर
- खवा
- पिठीसाखर
कृती
- एका भांड्यात खवा चांगला कुस्करून घ्या.
- त्यात पिठीसाखर आणि कोको पावडर घालून व्यवस्थित मिक्स करा.
- हे मिश्रण मंद आचेवर शिजवा. त्यात पिस्त्याची पावडर घाला आणि मिश्रण एकत्र होईपर्यंत ढवळत राहा.
- मिश्रण घट्ट झाल्यावर एका ताटात तूप लावून घ्या आणि त्यात हे मिश्रण थापून घ्या.
- थंड झाल्यावर बर्फीचे तुकडे करा.
