लवकरच दिवाळी येतेय.. त्या निमित्ताने अनेक घरात साफसफाईला सुरूवात झालीय. तर काही ठिकाणी दिवाळीचा फराळ आणि मिठाई बनवायचाही तयारी झालीय. दिवाळीचा सण जसजसा जवळ येतो तसतसा आपल्याला मिठाईचा सुगंध आणि गोडवा जाणवू लागतो. सणाच्या रंगात रंगून जाताना घरी गोड पदार्थांची मेजवानी बनवायला विसरू नका. केशर बासुंदीची रेसिपी घरी ट्राय करा आणि सणाचा गोडवा वाढवा…
साहित्य
- फुल क्रीम दूध
- साखर (आवडीनुसार)
- केसर (थोड्या दुधात भिजवलेले)
- वेलची पूड
- बदाम आणि पिस्ता काप (सजावटीसाठी)
- काजू (ऐच्छिक)
कृती
- केशर बासुंदी बनवण्यासाठी सर्वप्रथम, मोठ्या टोपात दूध गरम करण्यासाठी ठेवा. दुधाला उकळी आल्यानंतर गॅस मंद आचेवर ठेवून घ्या.
- दूध आटायला लागल्यावर बाजूने येणारी साय दुधात मिसळत राहा.
- दूध अर्धे होईपर्यंत किंवा घट्टसर होईपर्यंत आटवा. या प्रक्रियेला साधारणपणे ३०-४० मिनिटे लागतील.
- आता यात भिजवलेले केसर, साखर आणि वेलची पूड घाला. साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत ढवळा.
- काजू आणि बदाम घाला आणि आणखी ५ मिनिटे शिजवा जेणेकरून सर्व चव एकत्र येईल.
- गॅस बंद करा आणि बासुंदी थंड होऊ द्या.
- थंड झाल्यावर केशर आणि पिस्त्याच्या काप्याने सजवून सर्व्ह करा.
- काहींना बासुंदी गरम खायला आवडते तर काहींना बासुंदी थंड खायला आवडते.
- तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली केशर बासुंदी.












