अवघ्या काही दिवसात दिवाळी येणार असल्याने सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे, कोणाच्या घरी साफसफाई, कोणाच्या घरी फराळाची तयारी, कोणाकडे सजावटीची तयारी… दिवाळी हा सण दरवर्षी मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. पाच दिवस चालणारा उत्सव धनत्रयोदशीपासून सुरू होतो आणि भाऊबीजच्या दिवशी संपतो. यावेळी बाजारातून मिठाई आणण्याऐवजी घरीच काही साध्या सोप्या रेसिपी ट्राय करू शकता.
मावा बर्फी
साहित्य
- मावा (खवा)
- साखर (तुमच्या आवडीनुसार)
- वेलची पावडर (ऐच्छिक)
- बदाम किंवा पिस्त्याचे काप (सजावटीसाठी)
कृती
- एका जाड बुडाच्या कढईत मावा घ्या. मंद आचेवर मावा सतत ढवळत राहा जेणेकरून तो खाली चिकटणार नाही किंवा जळणार नाही.
- मावा चांगला गरम झाल्यावर त्यात साखर घाला आणि साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत आणि मिश्रण एकजीव होईपर्यंत ढवळत राहा.
- मिश्रण थोडे घट्ट होईपर्यंत शिजवा.
- मिश्रण घट्ट झाल्यावर त्यात वेलची पावडर मिसळा आणि एकजीव करा.
- एका ताटाला किंवा ट्रेला तूप लावून घ्या आणि तयार केलेले मिश्रण त्यात पसरवा. त्यावर बदाम किंवा पिस्त्याचे काप घालून दाबून घ्या.
- मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यावर बर्फीचे चौकोनी तुकडे करा.












