Diwali 2025 : यंदा दिवाळीसाठी बनवा कुरकरीत कडबोळी! जाणून घ्या रेसिपी..

कडबोळी दिवाळीच्या फराळातील एक पारंपरिक आणि चविष्ट पदार्थ आहे आणि तो दिवाळीच्या काळात नक्कीच खाल्ला जातो.

दिवाळी अगदी काहीच दिवसांवर येऊन ठेपली आहे, दिवाळी म्हंटलं पहिली आठवणारी गोष्ट म्हणजे फराळ. फराळाशिवाय दिवाळी होऊच शकत नाही. घराघरांमध्ये आता दिवाळीच्या फराळाची लगबग सुरु झाली आहे. आज आम्हीही तुमच्यासाठी एक फराळाचा खास पदार्थ घेऊन आलो आहोत कडबोळी चला तर आज जाणून घेऊयात रेसिपी…

साहित्य

  • २५० ग्रॅम तांदूळ
  • १०० ग्रॅम ज्वारी
  • १०० ग्रॅम बाजारी
  • १०० ग्रॅम गहू
  • १ चमचा चाणा डाळ
  • १ चमचा उदडाळ
  • १ चमचा मुगाची डाळ
  • १ चमचा जिरं
  • १ चमचा धणे
  • १/४ चमचा हळद
  • १ चमचा मिक्स करा
  • १ कप पाणी
  • मीठ
  • तळण्यासाठी तेल

कृती

  • भाजणीचे पीठ बनवण्यासाठी तवा गरम करा. त्यात तांदूळ, ज्वारी, बाजरी, गहू, हरभरा, उडीद डाळ, मूग डाळ, जिरे आणि धणे यापासून वर दिलेली सर्व धान्य चांगली भाजून घ्या.
  • सर्व साहित्य मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. भाजणीचे पीठ तयार आहे.
  • एका गोल तळाच्या पॅनमध्ये थोडे पाणी गरम करा. हळद, मीठ, मिक्स मसाला आणि थोडे तेल घाला. पाणी एक उकळी आणा आणि नंतर गॅल बंद करा.
  • भाजणीचे पीठ घालून चांगले मिक्स करावे. मिश्रण काही वेळ थंड होऊ द्या.
  • नंतर थोडे पाणी घालून त्या मिश्रणाचे पीठ मळून घ्या.
  • कडबोलीला हाताने वळून हातानेच गोलाकार द्या.
  • कडबोळी गरम तेलात रंग बदलेपर्यंत तळून घ्या.

About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News