कार्तिक महिना आला की कार्तिकी एकादशीची ओढ लागते. एकादशीनिमित्त अनेक जण उपवास देखील करतात. दिवसभर काही न खाता-पीता श्रद्धेने एकादशीचा उपवास केला जातो. कार्तिकी एकादशीनिमित्त आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय उपवासाला बनवला जाणारा खास साबुदाण्याचा स्वादिष्ट पराठा. उपवासाला साबुदाण्याची खिचडी आणि वडे नाही तर साबुदाण्याचा स्वादिष्ट पराठा बनवा…
साहित्य
- १ कप भिजवलेला साबुदाणा
- २-३ उकडलेले बटाटे
- १/२ कप भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट
- १-२ हिरव्या मिरच्या (बारीक चिरून)
- १/२ चमचा आले-मिरचीची पेस्ट
- चवीनुसार मीठ (उपवासाचे)
- कोथिंबीर (बारीक चिरलेली)
- तेल किंवा तुप
कृती
- एका मोठ्या भांड्यात भिजलेला साबुदाणा घ्या. त्यात उकडलेले बटाटे, शेंगदाणा कूट, हिरवी मिरची, आले-मिरचीची पेस्ट, मीठ आणि कोथिंबीर घालून सर्व साहित्य एकत्र करून मळून घ्या.
- मिश्रण घट्ट वाटल्यास थोडे पाणी घालून मऊ कणिक तयार करा.
- कणकेचे छोटे गोळे करून घ्या आणि त्यांना पराठ्यांसारखे लाटा.
- तवा गरम करून त्यावर थोडे तेल किंवा तूप सोडून पराठे दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजा.
- गरमागरम पराठे चटणी किंवा दह्यासोबत सर्व्ह करा.












