Tulsi Vivah 2025 : तुळशी विवाहाला प्रसादासाठी बनवा स्वादिष्ट गोड पुरणपोळी, वाचा सोपी रेसिपी

तुळशी विवाह हा एक शुभ विवाह सोहळा असल्यामुळे, या निमित्ताने देवासाठी पारंपरिक आणि शुभ मानले जाणारे पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवणे आवश्यक आहे.

तुळशी विवाहाच्या शुभ प्रसंगी पुरणपोळीसारखे गोड पदार्थ आणि उसाच्या रसाचा नैवेद्य म्हणून दाखवला जातो. यासोबतच, पंचामृत आणि इतर पारंपरिक मिठाई व फळे यांचाही नैवेद्य म्हणून वापर केला जातो. पुरणपोळीचा नैवेद्य दाखवणे एक पारंपरिक प्रथा आहे. चला तर मग जाणून घेऊया पुरणपोळीचात प्रसाद कसा बनवायचा.

साहित्य

  • चणा डाळ
  • गूळ
  • वेलची पावडर
  • मैदा
  • मीठ
  • चवीनुसार मीठ
  • तूप

कृती

  • पुरण पोळी बनवण्यासाठी सर्वप्रथम चणा डाळ काहीवेळ भिजत ठेवा. त्यानंतर कुकरमध्ये डाळ लावून २ शिट्या काढून घ्या.
  • टोपामध्ये चणा डाळ काढून पाणी बाजूला काढून घ्या. त्यानंतर त्यात गूळ मिक्स करून डाळ व्यवस्थित शिजवा.
  • डाळ शिजल्यानंतर त्यात वेलची पावडर आणि जायफळ पावडर टाकून मिक्स करून घ्या.
  • त्यानंतर डाळीचे मिश्रण मिक्सरच्या सहाय्याने किंवा चाळणीच्या सहाय्याने बारीक वाटून घ्या.
  • मैद्याच्या पिठात चवीनुसार मीठ टाकून मिक्स करा. त्यानंतर त्यात आवश्यतेनुसार पाणी टाकून पीठ मळून त्याला तूप किंवा तेल लावून बाजूला ठेवा.
  • पुरण पोळी बनवण्यासाठी सर्वप्रथम मैद्याच्या पिठाचा गोळा घेऊन त्यात तयार केलेले डाळीचे मिश्रण भरून गोळा तयार करा.
  • तयार केलेल्या पुरणाच्या गोळ्याला व्यवस्थित पीठ लावून लाटून घ्या. लाटून झाल्यानंतर तव्यात किंवा पॅनमध्ये टाकून दोन्ही बाजूने पुरण पोळी भाजा.
  • भाजून झाल्यानंतर तूप लावून काढून घ्या. तयार आहे नैवद्यासाठी साजूक तुपातली पुरणपोळी.

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News