तुळशी विवाहाच्या शुभ प्रसंगी पुरणपोळीसारखे गोड पदार्थ आणि उसाच्या रसाचा नैवेद्य म्हणून दाखवला जातो. यासोबतच, पंचामृत आणि इतर पारंपरिक मिठाई व फळे यांचाही नैवेद्य म्हणून वापर केला जातो. पुरणपोळीचा नैवेद्य दाखवणे एक पारंपरिक प्रथा आहे. चला तर मग जाणून घेऊया पुरणपोळीचात प्रसाद कसा बनवायचा.
साहित्य
- चणा डाळ
- गूळ
- वेलची पावडर
- मैदा
- मीठ
- चवीनुसार मीठ
- तूप
कृती
- पुरण पोळी बनवण्यासाठी सर्वप्रथम चणा डाळ काहीवेळ भिजत ठेवा. त्यानंतर कुकरमध्ये डाळ लावून २ शिट्या काढून घ्या.
- टोपामध्ये चणा डाळ काढून पाणी बाजूला काढून घ्या. त्यानंतर त्यात गूळ मिक्स करून डाळ व्यवस्थित शिजवा.
- डाळ शिजल्यानंतर त्यात वेलची पावडर आणि जायफळ पावडर टाकून मिक्स करून घ्या.
- त्यानंतर डाळीचे मिश्रण मिक्सरच्या सहाय्याने किंवा चाळणीच्या सहाय्याने बारीक वाटून घ्या.
- मैद्याच्या पिठात चवीनुसार मीठ टाकून मिक्स करा. त्यानंतर त्यात आवश्यतेनुसार पाणी टाकून पीठ मळून त्याला तूप किंवा तेल लावून बाजूला ठेवा.
- पुरण पोळी बनवण्यासाठी सर्वप्रथम मैद्याच्या पिठाचा गोळा घेऊन त्यात तयार केलेले डाळीचे मिश्रण भरून गोळा तयार करा.
- तयार केलेल्या पुरणाच्या गोळ्याला व्यवस्थित पीठ लावून लाटून घ्या. लाटून झाल्यानंतर तव्यात किंवा पॅनमध्ये टाकून दोन्ही बाजूने पुरण पोळी भाजा.
- भाजून झाल्यानंतर तूप लावून काढून घ्या. तयार आहे नैवद्यासाठी साजूक तुपातली पुरणपोळी.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)
