भाऊबीज व पाडव्याच्या नंतर दिवाळीचे मुख्य दिवस समाप्त होत असले तरी तुळशीच्या लग्नानंतरच खऱ्या अर्थाने दिवाळीची सांगता होते. तुळशी विवाह म्हणजे तुळशीचे रोप (वृंदा) आणि भगवान विष्णूचे शालिग्राम रूप (कृष्ण/विष्णू) यांचा विवाह लावण्याचा सोहळा. या दिवशी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तुळशी विवाह पार पडतात, तुळशीचे लग्न लागल्यानंतर मनोभावे पूजा करून पंचामृताचा प्रसाद अर्पण केला जातो. त्यानंतर सर्वांना पंचामृत प्रसाद दिले जाते. हे पंचामृत बनवायला अगदी सोपे आहे.
साहित्य
- अर्धा कप दूध
- अर्धा कप दही
- 1 चमचे मध
- 1 चमचे साखर
- 1 टीस्पून तूप
- 1 तुळशीचे पान
- सुका मेवा
कृती
- पंचामृत प्रसाद बनवण्यासाठी प्रथम एका भांड्यात दही घ्या आणि चांगले फेटून घ्या.
- त्यानंतर त्यात दूध घालावे. आता त्यात मध, आणि साजूक तूप टाका.
- तुम्हाला हवे असल्यास त्यात गुलाबजल आणि बारीक चिरलेले ड्रायफ्रुट्सही टाकू शकता.
- तयार केलेल्या पंचामृत प्रसादात तुळशीचे पान टाका आणि सर्व प्रथम ते पंचामृत तुळशीला अर्पण करा.
- पूजा संपल्यानंतर पंचामृत प्रसाद म्हणून घ्या.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)
