दिवाळी झाल्यानंतर सगळ्यांना वेध लागतात ते तुळशीच्या लग्नाचे. या नंतर लग्नसराईला सुरुवात होते. तुळशी विवाह हा देवउठणी एकादशीच्या दिवशी साजरा केला जातो. देवउठणी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू चार महिन्यांनी योगनिद्रातून जागे होतात आणि या दिवसापासून चातुर्मास संपतो. या दिवसाला देवोत्थान एकादशी किंवा प्रबोधिनी एकादशी असे म्हणतात. या दिवशी भगवान श्री हरी आणि तुळशी मातेची पूजा करण्याची परंपरा आहे. जाणून घेऊया शुभ मुहूर्त आणि पूजा पद्धत…
तुळशी विवाह कधी?
हिंदू पंचांगानुसार कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथीला तुळशी विवाह केला जातो. यंदा 2 नोव्हेंबर रोजी सकाळी 07 वाजून 31 मिनिटांनी शुक्ल पक्षातील द्वादशी तिथीला सुरूवात होईल. तसेच ही तिथी 3 नोव्हेंबर रोजी सकाळी 05 वाजून 07 मिनिटांनी संपेल. उदय तिथीनुसार, तुळशी विवाह 2 नोव्हेंबर 2025 रोजी साजरा केला जाईल.

तुळशी विवाहाचा शुभ मुहूर्त
सूर्योदय: सकाळी 06 वाजून 34 मिनिटां पर्यंत
सूर्यास्त: संध्याकाळी 05 वाजून 35 मिनिटां पर्यंत
चंद्रोदय: दुपारी 03 वाजून 21 मिनिटां पर्यंत
चंद्रोदय: सकाळी 03 वाजून 50 मिनिटां पर्यंत
3 नोव्हेंबर रोजी सकाळी 03 वाजून 50 मिनिटां पर्यंत
ब्रह्म मुहूर्त – सकाळी 04 वाजून 50 मिनिट ते सकाळी 05 वाजून 42 मिनिटां पर्यंत
तुळशी विवाह पूजाविधी
- तुळशी विवाहाची तयारी करताना सर्वात प्रथम पूजेचे साहित्य घरी आणावे.
- त्यानंतर तुळशीला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावे. तुळस जर कुंडीत लावली असेल किंवा वृंदावन मध्ये लावली असेल तर कुंडीला छान रंगवून घ्यावे, सजवावे.
- त्यानंतर शुभ मुहूर्तावर तुळशीची पूजा करावी. साज शृंगार तुळशीला चढवावा, फळे,फुले हार हळद कुंकू तुळशीला अर्पण करावे.
- धूप दीप अगरबत्ती लावून पूजा करावी. त्यानंतर श्रीकृष्णाची किंवा बाळकृष्णाची मूर्ती तुळशीच्या समोर चौरंगावर मूर्ती ठेवून पूजा करावी.
- मग अंतरपाठ धरून मंगलाष्टक म्हणावे व तुळशीचा विवाह संपन्न करावा.
- काहीजण घरीच स्वतः पूजा करतात तर काहीजण ब्राम्हणाला बोलावून विवाह पार पाडतात.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)











