Tulsi Vivah 2025 : तुळशीने गणपतीला शाप का दिला होता, जाणून घ्या पौराणिक कथा…

हिंदू धर्मात तुळशीला पवित्र आणि दिव्य मानले जाते. यासंदर्भात एक विशेष गोष्ट अशी आहे की, गणपतीच्या पूजेदरम्यान तुळशीचा वापर कधीही केला जात नाही.

दिवाळी झाल्यानंतर सगळ्यांना वेध लागतात ते तुळशीच्या लग्नाचे. तुळशीचे लग्न अगदी थाटामाटात पार पडल्यानंतर अनेक शुभ कार्याला सुरुवात होते. तुळशी विवाहापूर्वी देवउठणी एकादशीचे व्रत केले जाते. या दिवशी भगवान विष्णू निद्रावस्थेतून जागे होतात आणि चातुर्मासाची समाप्ती होते. कार्तिक शुद्ध द्वादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशीचा विवाह केला जातो. दरवर्षी द्वादशीला हा सोहळा घरोघरी साजरा होत असतो. परंतु, गणपतीच्या पूजेत तुळशीचा वापर करणे निशिद्ध मानले जाते. पण, त्यामागील दंतकथेबद्दल तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या गणेशाच्या पूजेत तुळस वर्जित का आहे?

पौराणिक कथा

पौराणिक कथेनुसार, राजा धर्मात्मजची कन्या तुळस ही लग्नाच्या इच्छेने तीर्थयात्रेवर निघाली. तीर्थयात्रेदरम्यान तुळशीने पाहिले की गणेश जी गंगेच्या किनाऱ्यावर तपस्या करत होते. पौराणिक कथेनुसार भगवान तपस्येत विलीन होते. त्यांच्या शरीरावर चंदन लागले होते. गळ्यात रत्नांची माळ होती. कमरेत रेशमचे पिताम्बर गुंडाळलेले होते. ते एका सिंहासनावर बसून तपश्चर्या करीत होते.

गणपतीचे ते सुंदर स्वरुप पाहून तुळशी मंत्रमुग्ध झाली. तिने त्यांच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त करत गणपतीची तपस्या भंग केली. भगवान गणेश हे पाहून संतप्त झाले आणि तुळशीचे हे कार्य अशुभ असल्याचे वर्णन केले. तुळशीचा हेतू जाणून घेतल्यानंतर ते म्हणाले की मी ब्रह्मचारी आहे आणि त्यांच्या लग्नाचा प्रस्ताव फेटाळून लावला.

हे ऐकून तुळशी संतापली आणि तिने भगवान गणपतीला शाप दिला की, तुझे एक नाही दोन विवाह होतील. यावर भगवान गणेशानेही तिला शाप दिला की, तुझे लग्न एका राक्षसासोबत होईल. हे ऐकून तुळशीने गणेशाची माफी मागितली.

तेव्हा गणेश जी म्हणाले की तुझे लग्न शंखचूर्णा नावाच्या राक्षसाशी होईल. पण तू रोपाचे रुप धारण करशील. ते म्हणाले की, कलियुगात तुळशी जीवन आणि मोक्ष देणारी असेल. पण तुझा वापर माझ्या पूजेत करणे निशिद्ध असेल. त्यामुळे गणपतीच्या पूजेत तुळशीचा वापर केला जात नाही. तुळस वनस्पती हिंदु धर्मात सर्वात पवित्र वनस्पती मानली जाते. तुळस ही भगवान विष्णूची आवडती आहे. तुळशीशिवाय त्यांची पूजा अपूर्ण मानली जाते.

तुळशी विवाहाचे महत्त्व

तुळशी विवाहानंतर लग्नासारख्या शुभ कार्यांसाठी मुहूर्त सुरू होतात. या विवाहामुळे कन्यादान केल्याचे पुण्य मिळते, अशी धार्मिक मान्यता आहे. तुळशीचे रोप हे पवित्र मानले जाते आणि विष्णूचा शालिग्राम अवतार याच्याशी तिचा विवाह लावणे हे एक महत्त्वाचे आध्यात्मिक कार्य मानले जाते. तुळशी विवाह कार्तिक महिन्याच्या शुद्ध पक्षातील एकादशी किंवा द्वादशीपासून पौर्णिमेपर्यंत केला जातो. तुळशी विवाहाचे महत्त्व हे वृंदा (तुळस) आणि भगवान विष्णू (शालिग्राम रूपात) यांच्या विवाह सोहळ्यात आहे, जो कार्तिक महिन्यातील एकादशी किंवा द्वादशी ते पौर्णिमेदरम्यान साजरा होतो. या विवाहामुळे कन्यादानाचे पुण्य मिळते, असे मानले जाते आणि यानंतर लग्नाचे शुभमुहूर्त सुरू होतात.

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News