प्रयत्न करूनही अडकलेले पैसे मिळत नाहीत, ‘हे’ ज्योतिषी उपाय करून पाहा

Asavari Khedekar Burumbadkar

आजच्या जीवनात प्रत्येक व्यक्तीला पैशाची गरज असते. पैशाशिवाय कोणतेही काम करणे जवळजवळ कठीण आहे. अनेकदा लोक पैशाच्या बाबतीत एकमेकांना मदत करतात. पण बऱ्याचदा असे दिसून येते की ज्यांना आपण पैसे देतो ते आपल्याला लवकर पैसे परत करत नाहीत. जर तुम्हीही अशा लोकांपैकी एक असाल ज्यांनी एखाद्याला पैसे दिले आहेत. पण तुम्हाला तुमचे कर्ज परत मिळू शकत नाही किंवा ते अडकले आहे. तर आज आम्ही तुम्हाला काही ज्योतिषी उपाय सांगत आहोत जे तुमचे पैसे परत मिळविण्यासाठी उपयुक्त ठरतील..

कापूर आणि लवंग

अडकलेले पैसे परत मिळविण्यासाठी रोज संध्याकाळी देव्हाऱ्यात दिवा लावावा. या दिव्यात थोडा कापूर आणि 2 लवंगा टाकून तो प्रज्वलित करा. या उपायानं आपले अडकलेले पैसे परत मिळवू शकता.

झाडे आणि रोपे

हिंदू धर्मात वनस्पतींना खूप महत्त्व मानले जाते. घराच्या योग्य दिशेला झाडे आणि रोपे लावली तर व्यक्तीला पैशाच्या समस्यांपासून मुक्तता मिळते. घराच्या आग्नेय दिशेला हिरवीगार झाडे आणि झुडुपे लावल्याने पैशाशी संबंधित समस्या येत नाहीत. वास्तुशास्त्रानुसार, काही विशिष्ट दिशेला झाडे लावल्याने घरात धन आकर्षित होते आणि आर्थिक समस्या कमी होतात.

हनुमानाची पुजा

शनिवार हा हनुमानाचा दिवस आहे. यासाठी मंगळवार किंवा शनिवार उपाय करून तुम्ही तुमचे पैसे परत मिळवू शकता. या दिवशी हनुमानजींसमोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावला तर ते प्रसन्न होतात. या उपायाने तुमचे अडकलेले पैसे परत मिळतात. तुमचे पैसे परत मिळण्यासाठी तुमच्या कुलदेवता आणि देवीची पूजा करा.

देवी लक्ष्मीची पूजा करणे

जर तुम्ही प्रयत्न करूनही अडकलेले पैसे परत मिळवू शकत नसाल, तर देवी लक्ष्मीची पूजा करणे फायद्याचे ठरू शकते. देवी लक्ष्मीची पूजा केल्याने तुम्हाला धन आणि समृद्धी मिळण्याची शक्यता वाढू शकते, असे मानले जाते.  शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा करणे आणि घरात सकारात्मक ऊर्जा ठेवणे या उपायांमुळे पैसे लवकर परत मिळण्याची शक्यता वाढू शकते.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

ताज्या बातम्या