Guru Nanak Jayanti : गुरु नानक जयंती! गुरुनानक देवजी यांचे मौल्यवान विचार जाणून घ्या….

गुरु नानक देवजींनी शीख समाजाचा पाया घातला होता. म्हणूनच त्यांना शिखांचे पहिले गुरु म्हटले जाते.

गुरु नानक देव हे शीख धर्माचे संस्थापक असल्याने, त्यांच्या जन्माने जगभरात ज्ञानाचा आणि प्रकाशाचा प्रसार झाला, म्हणूनच या दिवसाला ‘प्रकाश पर्व’ असे म्हणतात. हा सण कार्तिक पौर्णिमेला साजरा होतो आणि शीख समुदायासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या दिवशी गुरुद्वारांमध्ये विशेष कार्यक्रम आयोजित केले जातात, ज्यात भजन-कीर्तन आणि लंगर यांचा समावेश असतो. या सणाला ‘गुरु पर्व’ किंवा ‘गुरुपूरब’ असेही म्हटले जाते. 

कधी आहे गुरुनानक जयंती?

दरवर्षी कार्तिक पौर्णिमेला गुरुनानक जयंतीचा उत्सव साजरा केला जातो. यंदा गुरुनानक जयंती बुधवार, 5 नोव्हेंबर 2025 रोजी साजरी केली जाणार आहे.

गुरु नानक देव जींचे मौल्यवान विचार

  • गुरु नानक देव ज्यांनी एक ओंकारचा नारा दिला आणि सांगितले की सर्वांचा पिता परमेश्वर एकच आहे, म्हणून प्रत्येकाने सर्वांवर प्रेम केले पाहिजे.
  • आपण कधीही दुसऱ्याचा हक्क हिरावून घेऊ नये. आपण कठोर परिश्रम करत प्रामाणिकपणे गरीब आणि गरजूंना मदत केली पाहिजे.
  • माणसाने नेहमी लोभ सोडून कठोर परिश्रम केले पाहिजे आणि योग्य मार्गाने संपत्ती मिळवली पाहिजे.
  • गुरू नानक देव नेहमी स्त्री-पुरुष समान मानत, त्यांच्या मते स्त्रियांचा कधीही अनादर करू नये.
  • मेहनत आणि प्रामाणिकपणे काम करून त्यातूनही गरजूंना काहीतरी द्यायला हवे.
  • कर्माच्या भूमीवर फळ मिळविण्यासाठी प्रत्येकाला काम करावे लागते.
  • लोकांनी प्रेम, एकता, समता आणि बंधुतेचा संदेश दिला पाहिजे.

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News