एकादशीच्या उपवासाचे पदार्थ म्हणून वरईला महत्वाचे स्थान आहे. फायबर समृद्ध वरईपासून तुम्ही उपवासाला वेगवेगळे पदार्थ बनवू शकतात. आम्ही खास रेसिपी घेऊन आलो आहोत वरीची खीर.चला तर मग जाणून घेऊया वरीची खीर कशी बनवायची…
साहित्य
- भगर (वरई तांदूळ)
- दूध
- गूळ किंवा साखर
- वेलची पूड
- जायफळ (ऐच्छिक)
- मनुका, बदाम, काजू (सुका मेवा)
कृती
- भगरचे दाणे स्वच्छ धुवून घ्या.
- एका जाड बुडाच्या भांड्यात दूध उकळायला ठेवा.
- दूध उकळल्यावर त्यात भगरचे दाणे घाला आणि मिश्रण चांगले शिजेपर्यंत ढवळत राहा.
- भगर शिजल्यानंतर त्यात गूळ किंवा साखर घालून चांगले मिसळा.
- खीर थोडी घट्ट होईपर्यंत शिजवा.
- शेवटी वेलची पूड, जायफळ आणि सुका मेवा (मनुका, बदाम, काजू) घालून गॅस बंद करा.
- गरमागरम किंवा थंडगार खीर सर्व्ह करा.












