उपवासाच्या दिवशी आहारात मोजक्याच पदार्थांचे सेवन केले जाते. साबुदाण्याची खिचडी, साबुदाणा वडा किंवा वरीच्या तांदळाचा भात आणि शेंगदाण्याची आमटी बनवून खाल्ली जाते. मात्र नेहमीच तेच ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये भगरचा उपमा बनवू शकता. चला तर जाणून घेऊया भगरचा उपमा बनवण्याची सोपी रेसिपी…
साहित्य
- २ वाट्या भाजलेली भगर
- ४ वाट्या पाणी
- ८ हिरव्या मिरच्या (लांबीच्या दिशेने चिरलेल्या)
- मीठ, चवीनुसार
- चमचे तेल
कृती
- एका कढईत भगर मंद आचेवर सुमारे ५ मिनिटे भाजून घ्या.
- त्याच कढईत तेल गरम करून त्यात चिरलेल्या हिरव्या मिरच्या घाला.
- आता यात ४ वाट्या पाणी आणि चवीनुसार मीठ घाला.
- पाण्याला उकळी आल्यावर त्यात भाजलेली भगर टाका.
- झाकण ठेवून मंद आचेवर भगर शिजवा.
- गरमागरम उपमा सर्व्ह करा.
