Somwar Upay : सोमवारी करा ‘हे’ उपाय,आर्थिक अडचणी दूर होतील…

शंकराची पूजा करण्यासाठी सोमवारचा दिवस शुभ मानला जातो. कर्जापासून मुक्ती आणि सुख-समृद्धी मिळवायची असेल तर सोमवारी हे निश्चित उपाय करा.

सोमवार हा भगवान शिवाला समर्पित आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, सोमवारी घेतलेले काही विशेष उपाय खूप शुभ आणि प्रभावी मानले जातात. हे उपाय जीवनात सकारात्मकता, यश आणि स्थिरता आणण्यास मदत करतात. या दिवशी पूजा आणि काही उपाय केल्याने आर्थिक, आरोग्य आणि करिअरशी संबंधित समस्यांपासून मुक्तता मिळते. जाणून घ्या सोमवारचे उपाय…

दूध अर्पण करा

शिवलिंगावर कच्चे दूध, मध आणि साखर मिसळून अर्पण करा. यामुळे जीवनातील अडथळे दूर होतात आणि मनःशांती लाभते. प्रत्येक सोमवारी शिवलिंगावर कच्चे दूध अर्पण करा. यामुळे ग्रहदोष दूर होतात आणि आर्थिक समस्या कमी होतात असे मानले जाते.

मंत्राचा जप करा

सोमवारी सकाळी लवकर उठून स्नान करून शिवलिंगाला जल अर्पण करा. जल अर्पण केल्यानंतर, ‘ओम नमः शिवाय’ या मंत्राचा १०८ वेळा जप करा. असे मानले जाते की भगवान शंकर भक्तांच्या सर्व इच्छा आणि समस्या दूर करतात.

अभिषेक करा

तांब्याच्या भांड्यात गंगाजल आणि काळे तीळ घेऊन अभिषेक केल्यास कुंडलीतील अशुभ ग्रह शांत होतात आणि आर्थिक समस्या दूर होतात. सोमवार हा भगवान शंकराचा दिवस आहे. या दिवशी भगवान शंकराचा अभिषेक करून ‘ओम नमः शिवाय’ या मंत्राचा जप करा.

पांढरे वस्त्र परिधान करा

सोमवारच्या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करणे शुभ मानले जाते. 

गरजूंना दान करा

पांढऱ्या रंगाच्या वस्तू गरजूंना दान केल्याने कुंडलीतील चंद्राची स्थिती मजबूत होते आणि घरात सुख-समृद्धी येते. सोमवारी गरजू लोकांना दूध किंवा अन्न दान केल्याने चंद्राचा शुभ प्रभाव वाढतो आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा येते.

सोमवारी दान करणे शुभ असते. पांढरे कपडे, फुले, धान्य, मिठाई, दूध-दही, साखर मिठाई यासारख्या पांढर्‍या रंगाच्या वस्तूंचे सोमवारी दान करावे. यामुळे जीवनातील कष्ट दूर होतात.

शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करा

सोमवारी शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करा. असे केल्याने तुमच्या इच्छा पूर्ण होतात आणि आर्थिक समस्या दूर होतात. याशिवाय घरात कधीही आर्थिक संकट येत नाही.

तुपाचे दिवे लावा

सायंकाळच्या वेळी शिव मंदिरात साजूक तुपाचे ११ दिवे लावा. यामुळे तुमच्या जीवनातील समस्या दूर होतील आणि भगवान शंकराचा आशीर्वाद मिळेल

अक्षता अर्पण करणे

जर तुम्ही आर्थिक अडचणीत असाल, तर सोमवारी ‘अक्षता’ (अखंड तांदूळ) भगवान शंकराला अर्पण करा. असे केल्याने तुमचे नशीब उजळेल आणि पैशांची समस्या दूर होईल.

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News