Shri Rudrashtakam : सोमवारी करा श्री शिव रूद्राष्टकम स्तोत्राचे पठण; वाचा संपूर्ण ‘शिव रुद्राष्टक स्तोत्र’

रावणसारख्या शत्रूवर विजय मिळवण्यासाठी भगवान श्री रामाने शिव रुद्राष्टकम् पाठ केला होता. श्रीरामांनी रावणाचा वध करून लंका जिंकली. शिव रुद्राष्टकम् पठण केल्याने सर्वात मोठ्या शत्रूवरही विजय मिळवता येतो.

भगवान शिवाला देवांचा देव महादेव म्हणतात. असे म्हटले जाते की, कोणत्याही भक्ताने त्यांची मनापासून पूजा केल्यास महादेव त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण करतात. महादेवाला प्रसन्न करण्यासाठी अनेक पाठ आणि स्तुती आहेत. त्यातील एक म्हणजे ‘शिव रुद्राष्टक स्तोत्र’.

श्री शिव रुद्राष्टकम् पठणाचे महत्त्व

हे स्तोत्र भगवान शिवाला अत्यंत प्रिय आहे, ज्यामुळे त्यांची विशेष कृपा प्राप्त होते. याचे नियमित पठण केल्याने मानसिक ताण, भीती आणि क्रोध कमी होतो आणि आंतरिक शांतता मिळते. जीवनातील कष्ट, रोग, आर्थिक अडचणी आणि वाईट शक्तींपासून संरक्षण मिळते. नकारात्मक ऊर्जा दूर करून जीवनात सकारात्मकता आणते. हे स्तोत्र सर्व प्रकारच्या अडचणींचा नाश करते आणि शत्रूंवर विजय मिळवण्यास मदत करते.

शिव रुद्राष्टक स्तोत्र

नमामीशमीशान निर्वाण रूपं, विभुं व्यापकं ब्रह्म वेदः स्वरूपम् ।
निजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहं, चिदाकाश माकाशवासं भजेऽहम् ॥

निराकार मोंकार मूलं तुरीयं, गिराज्ञान गोतीतमीशं गिरीशम् ।
करालं महाकाल कालं कृपालुं, गुणागार संसार पारं नतोऽहम् ॥
तुषाराद्रि संकाश गौरं गभीरं, मनोभूत कोटि प्रभा श्री शरीरम् ।
स्फुरन्मौलि कल्लोलिनी चारू गंगा, लसद्भाल बालेन्दु कण्ठे भुजंगा॥
चलत्कुण्डलं शुभ्र नेत्रं विशालं, प्रसन्नाननं नीलकण्ठं दयालम् ।
मृगाधीश चर्माम्बरं मुण्डमालं, प्रिय शंकरं सर्वनाथं भजामि ॥
प्रचण्डं प्रकष्टं प्रगल्भं परेशं, अखण्डं अजं भानु कोटि प्रकाशम् ।
त्रयशूल निर्मूलनं शूल पाणिं, भजेऽहं भवानीपतिं भाव गम्यम् ॥
कलातीत कल्याण कल्पान्तकारी, सदा सच्चिनान्द दाता पुरारी।
चिदानन्द सन्दोह मोहापहारी, प्रसीद प्रसीद प्रभो मन्मथारी ॥
न यावद् उमानाथ पादारविन्दं, भजन्तीह लोके परे वा नराणाम् ।
न तावद् सुखं शांति सन्ताप नाशं, प्रसीद प्रभो सर्वं भूताधि वासं ॥
न जानामि योगं जपं नैव पूजा, न तोऽहम् सदा सर्वदा शम्भू तुभ्यम् ।
जरा जन्म दुःखौघ तातप्यमानं, प्रभोपाहि आपन्नामामीश शम्भो ॥
रूद्राष्टकं इदं प्रोक्तं विप्रेण हर्षोतये
ये पठन्ति नरा भक्तयां तेषां शंभो प्रसीदति।।
॥  इति श्रीगोस्वामितुलसीदासकृतं श्रीरुद्राष्टकं सम्पूर्णम् ॥
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)

About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News