Champa Shashti 2025 : चंपाषष्ठी विशेष रेसिपी वांग्याचे भरीत आणि बाजरीची भाकरी

चंपाषष्ठी हा खंडेरायाने मणी व मल्ल या दैत्यांचा वध करून मिळवलेल्या विजयाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. चंपाषष्ठीला खंडेरायाला नैवेद्य म्हणून वांग्याचे भरीत आणि बाजरीची भाकरी बनवली जाते.

चंपाषष्ठीला खंडेरायाला वांग्याचे भरीत आणि भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो. खरपूस भाजलेल्या वांग्याचं भरीत ही पारंपरिक आणि खास चंपाषष्ठीसाठी केली जाणारी एक लोकप्रिय रेसिपी आहे. याशिवाय, काही ठिकाणी कणकेचे रोडगे आणि इतर पारंपरिक पदार्थांचाही नैवेद्य दाखवला जातो.

वांग्याचे भरीत आणि भाकरी बनवण्याची पारंपरिक पद्धत

वांग्याचे भरीत

  • मोठे वांगे घेऊन ते थेट आचेवर चांगले भाजून घ्या. वांग्याची साल काळी पडली पाहिजे.
  • भाजलेले वांगे थंड झाल्यावर त्याची साल काढून टाका.
  • एका कढईत तेल गरम करून त्यात जिरे, मोहरी, हिंग, हळद घालून फोडणी करा.
  • नंतर त्यात चिरलेला कांदा, हिरवी मिरची आणि लसूण घालून परतून घ्या.
  • आता मॅश केलेले वांगे घालून आवश्यकतेनुसार मीठ आणि तिखट टाका.
  • बारीक चिरलेली कोथिंबीर आणि कांद्याची पात घालून गरमागरम वांग्याचे भरीत तयार करा

भाकरी

  • बाजरीचे पीठ (किंवा ज्वारीचे पीठ) कोमट पाण्याने मळून घ्या.
  • पिठाचा एक गोळा घेऊन त्याची जाडसर भाकरी थापून घ्या.
  • भाजणीच्या तव्यावर भाकरी चांगली भाजून घ्या. 

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News