Datta Jayanti 2025 : दत्तात्रेयांचा जन्म कसा झाला? जाणून घ्या यामागील कथा…

Asavari Khedekar Burumbadkar

हिंदू धर्मात दत्तजयंतीला विशेष धार्मिक महत्त्व आहे. या दिवशी दत्तात्रेयांची पूजा आणि उपासना केल्याने ज्ञान, शांती आणि समृद्धी प्राप्त होते, अशी श्रद्धा आहे. दत्तजयंतीपूर्वी ९ दिवस ‘दत्त नवरात्र’ साजरी करतात आणि पौर्णिमेला दत्तजयंतीचा उत्सव असतो. या दिवशी भक्त दत्त पादुकांची किंवा मूर्तीची पूजा करतात आणि काही ठिकाणी दत्त परिक्रमादेखील करतात.  भक्त ‘गुरुचरित्र’ ग्रंथाचे पठण करतात आणि भजन-कीर्तनाद्वारे दत्त महाराजांची भक्ती करतात. या दिवशी दत्त व्रत आणि दत्त दर्शन केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी श्रद्धा आहे. 

दत्तात्रेयांचा जन्म कसा झाला?

पौराणिक कथेनुसार, एकेकाळी माता पार्वती, लक्ष्मी आणि सरस्वती यांना त्यांच्या पती-पूजा धर्माचा अभिमान वाटला होता. नारद मुनींना देवतांचा हा अभिमान मोडायचा होता, म्हणून ते या तिघींसमोर अनसूयेच्या पतिव्रता धर्माची स्तुती करू लागले. यामुळे तिन्ही देवींना माता अनसूयेविषयी मत्सर वाटला आणि त्यांनी त्रिदेवांना माता अनसूयेचे व्रत तोडण्यास सांगितले. बळजबरीने, तिन्ही देवांनी ऋषींचा वेश धारण केला आणि अनुसूयाची परीक्षा घेण्यासाठी आश्रमात पोहोचले. देवी अनुसूयाने देवांना भिक्षुकांच्या वेशात पाहून भिक्षा आणली परंतु तिन्ही देवतांनी ती स्वीकारण्यास नकार दिला.

त्रिमुर्ती म्हणाले की आम्हाला अन्न खाण्याची इच्छा आहे. त्यावेळी अत्रि मुनी आश्रमात नव्हते, तेव्हा देवी अनुसुयाने त्रिमुर्तींच्या विनंतीला सहमती दिली. त्यावेळी तिन्ही देवतांनी देवी अनुसुया यांना नग्नावस्थेत भोजन देण्यास सांगितले. . त्यावेळी देवी अनुसुया खूप क्रोधित झाल्या आणि तिच्या दिव्य दृष्टीने त्यांना त्रिमूर्तीचे सत्य कळले. पण तिला आतिथ्य धर्म गमवायचे नव्हते, म्हणून त्यांनी नारायणाचे आणि आपल्या पतीचे स्मरण केले आणि ह्याला भगवंतांची इच्छा मानून त्या म्हणाल्या की – जर माझे पतिव्रत धर्म खरे आहेत तर हे तिन्ही अतिथी सहा-सहा महिन्याचे बाळ व्हावे. त्यांचे एवढेच म्हणणे होते की ते तिन्ही देव सहा-सहा महिन्याचे बाळ झाले आणि रडू लागले. तेव्हा अनुसूया मातेने त्यांना आपल्या मांडीत घेऊन दूध पाजले आणि पाळण्यात घातले.

बराच काळ गेला. देव लोकात ते तिन्ही देव परतले नाही म्हणून तिन्ही देवी खूप विचलित झाल्या. परिणामी नारद आले आणि त्यांनी घडलेले सर्व काही सांगितले. तिन्ही देवी अनुसूया कडे परत आल्या आणि घडलेल्या प्रकाराची क्षमा मागितली.

देवी अनुसुयाने आपल्या पतिव्रत धर्मामुळे तिन्ही देवांना त्यांच्या रूपात परत केले. तिन्ही देवांनी त्यांना वर मागण्यास सांगितले तर ते म्हणाले की आपण तिन्ही देव मला मुलांचा रूपात प्राप्त व्हावे. देवांनी ‘तथास्तु’ म्हणून आपल्या देवलोकात निघून गेले.

काळांतरानंतर हे तिन्ही देव अनुसूयाच्या गर्भातून प्रकट झाले. ब्रह्माच्या अंशातून चंद्र, शंकराच्या अंशातून दुर्वासा आणि विष्णूच्या अंशातून दत्तात्रेय जन्मले. दत्त भगवान हे श्री विष्णू भगवान चे अवतार आहे आणि ह्यांच्या जन्माची तिथी दत्त जयंतीच्या नावाने प्रख्यात आहे.

दत्तात्रेय हा कोणाचा अवतार आहेत?

दत्तात्रेय हे ब्रह्मा, विष्णू आणि शिव या त्रिमूर्तींचे एकत्र रूप आणि अवतार मानले जातात. त्यांना विष्णूचा सहावा अवतार मानले जाते आणि ते कलियुगातील देवता आहेत.

  • त्रिमूर्ती अवतार: दत्तात्रेय हे ब्रह्मा (निर्माता), विष्णू (पालनकर्ता) आणि शिव (संहारक) या तिन्ही देवतांचे एकत्रित रूप आहेत.
  • विष्णूचा अवतार: त्यांना विष्णूच्या चोवीस अवतारांपैकी सहावा अवतार मानले जाते. काही ठिकाणी त्यांना चौथा किंवा सातवा अवतार देखील म्हटले जाते.
  • कलियुगातील देवता: दत्तात्रेय हे कलियुगातील देव मानले जातात आणि त्यांची पूजा केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते असे मानले जाते. 

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)

ताज्या बातम्या