हिंदू धर्मात गंगानदी पवित्र मानली जाते. गंगा नदीचे जल पवित्र आणि शुद्ध मानले जाते. घरात गंगाजल ठेवण्याचे काही नियम आहेत. जाणून घेऊयात..
गंगाजलच महत्व
हिंदू धर्मात गंगाजल अत्यंत पवित्र आणि शुभ मानले जाते. दररोज देवपूजा करण्यापूर्वी देवघरातील देवी-देवतांना आणि स्वतःला गंगेजलाने शुद्ध केलं पाहिजे. तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा शिरली आहे किंवा काही अशुभ घडत आहे, असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही दररोज तुमच्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यात पवित्र गंगाजल शिंपडावं. असं मानलं जातं की, गंगाजल शिंपडल्याने अचानक लागणारी नजर आणि वाईट स्वप्नांपासून संरक्षण होतं. गंगाजल घरात सकारात्मक ऊर्जा आणते आणि आध्यात्मिक वातावरण निर्माण करते. कोणत्याही पूजेमध्ये गंगाजल वापरले जाते आणि घरात ते ठेवल्यास पूजा पूर्ण होते असे मानले जाते.

गंगाजल अपवित्र ठिकाणी ठेवू नये
गंगाजल नेहमी स्वच्छ आणि पवित्र ठिकाणी ठेवावे. ते कधीही अपवित्र जागी ठेवू नये. घरात गंगाजल ठेवताना ते नेहमी स्वच्छ आणि पवित्र जागी ठेवावे, अपवित्र ठिकाणी (जसे की शौचालय किंवा कचराकुंडीजवळ) ठेवू नये.
गंगाजल धातूच्या भांड्यात ठेवावं
गंगाजल प्लास्टिकच्या बाटलीत ठेवू नये, कारण ते अशुद्ध मानले जाते. ते तांबे, पितळ किंवा चांदीच्या भांड्यात ठेवावे, जेणेकरून त्याचे फायदे मिळतील. गंगाजल पवित्र असते त्यामुळं ते नेहमी शुद्ध धातूपासून बनवलेल्या भांड्यातच ठेवावे. चांदीच्या भांड्यात ठेवल्यास मानसिक स्थिती मजबूत होते.
खराब हातांनी स्पर्श करू नये
गंगाजलला कधीच खराब हाताने किंवा खराब वस्त्र परिधान करुन हात लावू नका. नेहमी हात स्वच्छ धुवूनच गंगाजलला स्पर्श करा. गंगाजल उचलताना किंवा स्पर्श करताना ते स्वच्छ हात आणि स्वच्छ कपडे घालूनच उचलावे.
तामसिक पदार्थ खाल्ल्यानंतर गंगाजलला स्पर्श करणे टाळा
तामसिक पदार्थ (जसे की मांस किंवा कांदा-लसूण) खाल्ल्यानंतर गंगाजलाला स्पर्श करणे टाळले पाहिजे. तामसिक पदार्थ खाल्ल्यानंतर गंगाजलाला स्पर्श करू नये, कारण हे त्याच्या पावित्र्याला अपवित्र मानले जाते. मांस किंवा कांदा-लसूण असलेल्या खोलीत गंगाजल ठेवू नये.
दिशा
वास्तुशास्त्रानुसार, ईशान्य कोपरा (उत्तर-पूर्व) गंगाजल ठेवण्यासाठी सर्वात शुभ आहे. गंगाजल नेहमी ईशान्य दिशेला ठेवावे, अशी मान्यता आहे. फक्त गंगाजलच नाही तर इतर पवित्र नद्यांचे पाणीदेखील ईशान्य दिशेला ठेवावे.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)