मंदिरात आपण जेव्हा जातो तेव्हा मनोभावे आपण भगवंताची पूजा करतो, प्रार्थना करतो. पण बऱ्याच जणांना हे माहित नसेल की, जसे मंदिरात पूजा करण्याचे काही नियम असतात तसेच नियम मंदिरातून परततानाचे देखील नियम असतात. जे पाळणेही आवश्यक आहे.
घरी आल्यानंतर प्रसाद ग्रहण करावा
मंदिरात मिळालेला प्रसाद घरी आल्यानंतर सेवन करावा. मंदिरात मिळालेला प्रसाद घरी आल्यानंतर कुटुंबासोबत खाणे शुभ मानले जाते; त्यामुळे तो वाटेत खाऊ नये.

नकारात्मक विचार टाळा
मंदिरातून बाहेर पडताना मनात नकारात्मक विचार आणू नयेत, यामुळे सकारात्मक ऊर्जा घरात येत नाही, असे मानले जाते. दर्शनानंतर लगेचच नकारात्मक विचार करणे, ईर्ष्या करणे किंवा कोणाबद्दल वाईट बोलणे टाळावे. यामुळे पूजेचा सकारात्मक परिणाम कमी होतो, असे म्हटले जाते.