Shani Dev : शनिवारी ‘या’ गोष्टी करून पाहा; शनिदेवांची कृपा होईल..

शनिवार हा शनिदेवांना समर्पित असल्याने, त्यांची पूजा करणे आणि त्यांना तेल अर्पण करणे शुभ मानले जाते. या उपायांमुळे आर्थिक अडचणी दूर होतात आणि शनिदेवाची कृपा राहते असे मानले जाते.

शनिवारी बरेचजण शनिदेवाच्या मंदिरात जातात पूजा करतात. पण योग्य पद्धतीने शनिदेवाची पूजा केल्यास तसेच काही उपाय केल्यास घरातील शनिदेवाचा आशीर्वाद मिळतो. तसेच घरातील आर्थिक परिस्थिती देखील सुधारते.

दान करा

शनिवारी काळी उडीद डाळ, काळे तीळ, मोहरीचे तेल, काळे कपडे किंवा लोखंडी वस्तू गरजूंना दान करा. विशेषतः गरीब, अपंग किंवा कामगार वर्गातील लोकांना या वस्तू देणे शुभ मानले जाते.

तिळाच्या तेलाने अभिषेक

शनिदेवाला तिळाच्या तेलाने अभिषेक करा. हे आर्थिक अडचणी दूर करण्यास मदत करते. ‘ॐ शं शनैश्चराय नमः’ हा मंत्र जपून, तिळाच्या तेलाने शनिदेवांच्या मूर्तीवर अभिषेक करा. तेल अर्पण करण्यापूर्वी त्यात काळे तीळ मिसळू शकता.

शनिदेवाची पूजा

शनिदेवाच्या मंदिरात जाऊन त्यांची विधिवत पूजा करा. शनिवारी सायंकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. हे उपाय शनिदेवाला प्रसन्न करतात.

काळ्या रंगाची वस्तू टाळा

शनिवारी काळ्या रंगाची कोणतीही वस्तू खरेदी करणे टाळा, कारण यामुळे आर्थिक अडचणी वाढू शकतात असे मानले जाते. या वस्तू एक दिवस आधी खरेदी करून ठेवाव्यात. शनिवारी काळे तीळ आणि मोहरीचे तेल यांसारख्या वस्तू खरेदी करणे टाळा, कारण ते दान करण्यासाठी आधीच विकत घेऊन ठेवावे लागतात. शनिवारी खरेदी केल्यास त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो असे मानले जाते.

हनुमान पूजा

शनिदेवासोबतच हनुमान पूजेचेही महत्त्व आहे. हनुमान चालीसाचा पाठ करणे.  शनिदेवांसोबतच हनुमानजींची पूजा करणे देखील फायदेशीर मानले जाते. हनुमानजींना चोला अर्पण केल्याने व्यवसायात यश मिळते आणि शनिसाडेसातीचा प्रभाव कमी होतो.

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News