गीता जयंती या दिवशी श्रीकृष्णांनी कुरुक्षेत्राच्या रणांगणात अर्जुनाला गीतेचा उपदेश केला होता. आपल्यावर श्रीकृष्णाची कृपा राहण्यासाठी गीता जयंतीच्या दिवशी काय करावे आणि काय करु नये जाणून घेऊया…
गीता जयंतीच्या दिवशी काय करावे
- गीता जयंतीच्या दिवशी भगवद्गीतेचे पठण अवश्य करावे.
- भगवान श्रीकृष्णाची पूजा करावी आणि मंत्रजप करावा.
- या दिवशी दानधर्म केल्यानेही शुभ फळ मिळते.
- तुम्ही या दिवशी मोक्षदा एकादशीचे व्रत देखील करू शकता.
- या दिवशी केवळ सात्विक आणि शुद्ध अन्नाचे सेवन करा.
- ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’ या मंत्राचा जप करावा. यामुळे पुण्यप्राप्ती होते आणि सर्व त्रासांपासून मुक्ती मिळते असे मानले जाते.
गीता जयंतीच्या दिवशी काय करू नये
- अस्वस्थ राहणे किंवा आळस करणे टाळावे.
- गीता जयंतीच्या दिवशी मांस, मद्य यांसारख्या तामसिक पदार्थांचे सेवन टाळावे.
- या दिवशी नकारात्मक विचार आणि भावना मनात आणू नये.
- स्नान न करता किंवा अस्वस्थ मनाने गीतेचे पठण सुरू करू नका.
- जर तुम्ही गीता पठण करत असाल तर संपूर्ण अध्याय वाचल्यानंतरच उठा.
- एकादशी असल्याने या दिवशी तुळशीच्या झाडाला पाणी अर्पण करू नका किंवा त्याची पाने काढू नका.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)












