Gita Jayanti 2025 : गीता जयंतीचे धार्मिक महत्त्व आणि गीतेची आरती 

Asavari Khedekar Burumbadkar

आज, १ डिसेंबर २०२५ रोजी मार्गशीर्ष शुक्ल पक्षाच्या एकादशीला म्हणजेच मोक्षदा एकादशीला गीता जयंती साजरी केली जात आहे. या दिवशी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेचा उपदेश दिला होता, ज्यामुळे या दिवसाला मोठे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे.

धार्मिक महत्त्व

या दिवशी गीता पठण केल्याने मोक्षप्राप्ती होते, पुण्य मिळते आणि जीवनातील कठीण समस्या दूर होतात असे मानले जाते. या दिवसाला ‘मोक्षदा एकादशी’ असेही म्हणतात आणि या दिवशी व्रत केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते व मृत पूर्वजांना मोक्ष मिळतो असे मानले जाते.

गीतेची आरती 

जयदेव जयदेव जय भगवद्गीते ।
तापत्रय संहारुनि वारी भवदुरीतें ॥धृ॥

पार्थरथावरि बसले असतां भगवान ।
त्याच्या मुखकमळांतुनि जालिसि निर्मांण ।
तव श्रवणाच्या योगें पंडूनंदन ।
मोहातीत होउनिया जाला पावन ॥१॥

अष्टादश अध्यायीं तूझा विस्तार ।
लेखनपठ्णश्रवणें उद्धरिसि नर ।
हरिहर – ब्रह्मा स्तविति तुज वारंवार ।
अगाध महिमा नकळे कवणासी पार ॥२॥

श्रीकृष्णें काढुनिया वेदाचें सार ।
प्रगट केली ब्रम्हविद्या परिकर ॥
सर्वहि विश्वजनाचा केला उद्धार ।
निरंजनपद देउनि हरिला संसार ॥३॥

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)

ताज्या बातम्या