मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील मोक्षदा एकादशीच्या दिवशी गीता जयंतीचा उत्सव साजरा केला जातो. याच दिवशी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेचे ज्ञान दिले होते. यावर्षी गीता जयंती कधी आहे? महत्व आणि पूजा पद्धत जाणून घेऊयात…
गीता जयंतीचे महत्व
गीता जयंती मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला (मोक्षदा एकादशी) साजरी केली जाते. या दिवशी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेचा उपदेश दिला होता, त्यामुळे या दिवसाला खूप महत्त्व आहे. या दिवशी उपवास केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि जीवनातील दुःखांपासून मुक्ती मिळते असे मानले जाते. या दिवशी भगवान श्रीविष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. या दिवशी भगवद्गीतेचे पठण केल्याने पुण्यप्राप्ती होते.

कधी आहे गीता जयंती ?
एकादशी तिथी रविवार, 30 नोव्हेंबर रोजी रात्री 9 वाजून 30 मिनिटांनी सुरू होईल. आणि सोमवारी, 1 डिसेंबर 2025 रोजी संध्याकाळी 7 वाजून 02 मिनिटांनी संपेल. उदय तिथीनुसार सोमवारी, 1 डिसेंबर 2025 रोजी गीता जयंतीचा उत्सव साजरा केला जाईल.