मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशीला गीता जयंती साजरी केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार भगवान श्रीकृष्णांनी या दिवशी अर्जुनाला गीतेचा उपदेश केला होता. यंदा गीता जयंती ही सोमवारी, 1 डिसेंबर 2025 रोजी साजरी करण्यात येणार आहे. गीता जयंती का साजरी केली जाते? जाणून घ्या…
गीता जयंती का साजरी केली जाते ?
महाभारतानुसार, कुरुक्षेत्रावर अर्जुनाच्या मनात गोंधळ निर्माण झाल्यावर श्रीकृष्णाने त्याला कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोग यांसारख्या विषयांवर आधारित भगवद्गीतेचा उपदेश दिला होता. हा उपदेश जीवनातील तत्त्वज्ञान आणि मूल्यांवर आधारित असल्याने, तो दिवस ‘गीता जयंती’ म्हणून साजरा केला जातो. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला कुरुक्षेत्राच्या रणांगणावर भगवद्गीतेचा उपदेश दिला होता. या दिवसाला ‘मोक्षदा एकादशी’ असेही म्हणतात. या दिवशी भगवद्गीतेचे पठण करणे, भगवान विष्णू आणि श्रीकृष्णाची पूजा करणे आणि दानधर्म केले जातात.

गीता जयंतीचे धार्मिक महत्त्व
गीता जयंती मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला येते, म्हणून या दिवसाला ‘मोक्षदा एकादशी’ असेही म्हणतात. या दिवशी उपवास केल्याने मोक्षप्राप्ती होते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. गीतेमध्ये कर्म, ज्ञान, भक्ती आणि वैराग्य यांसारख्या जीवनाच्या अनेक महत्त्वाच्या पैलूंवर मार्गदर्शन केलेले आहे. गीतेचे पठण केल्याने जीवनातील समस्या आणि तणाव कमी होतो. यातून आत्मविश्वास वाढतो आणि जीवनातील सत्याची जाणीव होते, असे मानले जाते.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)