Kuldevta : तुम्हाला तुमची कुलदेवता माहित नाही? तर जाणून घ्या ‘या’ गोष्टी

जर तुम्हाला तुमची कुलदेवता किंवा कुलदेवी माहित नसेल, तर ती शोधण्यासाठी या महत्वाच्या बाबी उपयुक्त ठरू शकतील.

हिंदू धर्मामध्ये कुलदेवतेला विशेष स्थान आहे. कुलदेवतेला त्या कुळाची रक्षक मानली जाते आणि तिची पूजा केल्याशिवाय कोणतेही शुभ कार्य सुरू होत नाही. अनेकांना त्यांचे कौटुंबिक देवता माहीत नसते. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या कुटुंबातील देवतांना कसे शोधू शकता ते जाणून घेऊया…

कुलदैवत म्हणजे काय?

‘कुल’ म्हणजे कुटुंब किंवा वंश आणि ‘देवता’ म्हणजे देव, या दोन शब्दांपासून ‘कुलदैवत’ हा शब्द बनलेला आहे. कुलदैवत हे कुटुंबाचे रक्षण करते असे मानले जाते आणि यासाठी याची परंपरागत माहिती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे दिली जाते. महाराष्ट्रात अनेक लोकांचे कुलदैवत खंडोबा, तुळजाभवानी किंवा कोल्हापूरची अंबाबाई अशी आहेत. कुलदेवतेचे स्थान घरात कायम राहावे आणि त्याची सेवा करता यावी यासाठी कुलदैवत टाक बनवले जातात. कुलदैवत किंवा कुलदेवी वंशाचे म्हणजे कुळाचे रक्षक मानले जातात.

कुटुंबातील ज्येष्ठांशी बोला

तुमच्या आई-वडिलांशी, आजी-आजोबांशी किंवा काका-काकू यांच्याशी बोला. त्यांना तुमच्या कुलदेवतेबद्दल माहिती असू शकते. एखाद्या व्यक्तीचे पूर्वज ज्या ठिकाणी राहत होते त्या ठिकाणच्या देवी-देवतादेखील त्या व्यक्तीचे कुलदैवत मानले जातात. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या घरातील वडिलधाऱ्यांशी बोलून तुमची कुलदेवता किंवा कौटुंबिक देवता शोधू शकता.

मूळ गावी जाऊन माहिती मिळवा

तुमच्या मूळ गावी जाऊन कुटुंबातील सदस्यांनी ज्या मंदिरांमध्ये पूजा केली आहे, त्या ठिकाणी भेट द्या. तिथले पुजारी तुम्हाला मार्गदर्शन करू शकतात.

ज्योतिषाचा सल्ला घ्या

तुम्ही ज्योतिषशास्त्रानुसार तुमची कुंडली पाहून तुमची कुलदेवी कोण आहे हे शोधू शकता. काही ज्योतिषी जन्मकुंडलीनुसार पाचव्या घराच्या स्वामीच्या आधारावर इष्ट देव शोधण्यास मदत करतात. कुंडलीत काही घरांचा विचार केला जातो, ज्यांना पाहून एखाद्या व्यक्तीचे कुल देवता किंवा कुल देवता कळू शकते.

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News