हिंदू धर्मात देवी लक्ष्मी, देवी पार्वती आणि देवी सरस्वती या तीन प्रमुख देवी म्हणून पूजल्या जातात. या तीन देवींमध्ये, देवी लक्ष्मी ही संपत्तीची देवी आणि देवी सरस्वती ही विद्येची देवी म्हणून ओळखली जाते. देवी सरस्वती जीभेवर विराजमान असते म्हणजे त्यावेळी जे बोलले जाते ते अगदी खरे होते. म्हणूनच माणसाने नेहमी चांगल्या गोष्टी बोलण्याचा सल्ला दिला जातो. पण ज्या वेळेला सरस्वती आपल्या जीभेवर असते ती वेळ नक्की कोणती हे जाणून घेऊयात…
सरस्वती देवीचा जिभेवर वास असण्याची वेळ
हिंदू धर्मात पहाटे 3 नंतरच्या वेळेला ब्रह्म मुहूर्त म्हणतात. ही वेळ नवीन दिवसाची सुरुवात मानली जाते. देवी सरस्वती जिभेवर बसण्याची उत्तम वेळ पहाटे 3.20 ते 3.40 पर्यंत असते. यावेळी देवी सरस्वतीचे ध्यान करून तुम्ही जे काही बोलता किंवा इच्छा धरता ते सर्व खरे ठरते. दुसरीकडे, जर विद्यार्थ्यांनी ब्रह्म मुहूर्तावर सरस्वतीची पूजा करून अभ्यास केला तर त्यांची बुद्धिमत्ता आणि एकाग्रता वाढते आणि मानसिक विकास देखील मजबूत होतो.

‘या’ काळात नक्की कोणत्या गोष्टी बोलल्या पाहिजेत?
देवी सरस्वती ब्रह्म मुहूर्ताच्या वेळी जिभेवर विराजमान होते, जो साधारणपणे पहाटे ३ वाजल्यानंतरचा काळ आहे. या वेळेला सकारात्मक आणि विचारपूर्वक बोलणे महत्त्वाचे मानले जाते, कारण या काळात बोललेले शब्द खरे ठरू शकतात असे म्हटले जाते. या वेळेला बोललेले शब्द खरे ठरतात अशी श्रद्धा आहे, त्यामुळे नकारात्मक बोलणे टाळावे.
ब्रह्म मुहूर्त म्हणजे काय?
ब्रह्म मुहूर्त हा हिंदू धर्मातील एक शुभ काळ आहे, जो सूर्योदयाच्या सुमारे दीड तास आधी सुरू होतो. या वेळेला नवीन दिवसाची सुरुवात मानली जाते आणि हा काळ खूप शांत आणि पवित्र मानला जातो. या वेळेत केलेले ध्यान, अभ्यास किंवा जप अधिक प्रभावी मानला जातो. या काळात चांगले विचार करावेत आणि सकारात्मक गोष्टी बोलाव्यात.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)











