घरात लाकडी देव्हारा ठेवण्याशी संबंधित वास्तुचे अनेक नियम आहेत. जर तुम्ही तुमच्या घरात लाकडी देव्हारा ठेवत असाल तर तुम्हाला त्याच्याशी संबंधित काही नियम आहेत. जाणून घेऊयात..
घरात लाकडी देव्हारा असणं शुभ की अशुभ?
घरात लाकडी देव्हारा असणे शुभ मानले जाते, कारण लाकूड हे नैसर्गिक आणि सकारात्मक ऊर्जा देणारे मानले जाते, पण तो ठेवताना दिशा आणि त्याच्या खाली स्वच्छता राखणे महत्त्वाचे आहे; चुकीच्या दिशेला किंवा जागेवर ठेवल्यास नकारात्मक परिणाम होऊ शकतात, त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार योग्य नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

देव्हारा भिंतीवर टांगू नका
देव्हारा जमिनीवर थेट ठेवू नये, तर एका चौथऱ्यावर ठेवावा. भिंतीवर टांगणे टाळावे, ज्यामुळे देवघराची उंची योग्य राहते आणि नकारात्मक ऊर्जा पसरत नाही.
देव्हाऱ्यासाठी पूर्व-पश्चिम दिशा शुभ
देवघर शक्यतो ईशान्य पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे, कारण या दिशा सकारात्मक ऊर्जा आणतात आणि पूजा करताना या दिशांना तोंड करून बसणे शुभ मानले जाते. पूर्व दिशेला लाकडी देव्हारा स्थापित करा. जेव्हा तुम्ही देव्हाऱ्यात पूजा करता तेव्हा तुमचं तोंड पूर्वेकडे आणि तुमची पाठ पश्चिमेकडे असावी. दक्षिण दिशेला देव्हारा ठेवणे टाळावे, कारण ते अशुभ मानले जाते.
लाकडी देव्हाऱ्यात धूळ, माती किंवा वाळवी लागू देऊ नका
वास्तूशास्त्रानुसार, घरात लाकडी देव्हारा ठेवणे शुभ मानले जाते, पण लाकडी देव्हारा ठेवल्यास तो स्वच्छ, ठेवावा. आणि धूळ-मातीपासून दूर ठेवावा, कारण लाकडी देव्हाऱ्यात वाळवी लागणे किंवा तो अस्वच्छ राहणे अशुभ मानले जाते, ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा येते; त्यामुळे स्वच्छतेची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. लाकडी देव्हाऱ्यात धूळ, माती किंवा वाळवी लागणे खूप अशुभ मानले जाते. यामुळे घरात नकारात्मकता पसरते.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)











