Champa Shashthi 2025 : “भवतम संहारुनिया दाखवि निजमाया” खंडेरायाची आरती

Asavari Khedekar Burumbadkar

मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील षष्ठी तिथीला चंपाषष्ठी साजरी केली जाते. या दिवशी खंडोबाच्या जयघोषात ‘तळीभरण’ हा विधी केला जातो, ज्यामध्ये बेल, भंडारा, सुपारीने देवाला ओवाळले जाते आणि ‘सदानंदाचा येळकोट, भैरवनाथाचे चांगभले’ असा जयजयकार केला जातो.

“भवतम संहारुनिया दाखवि निजमाया” आरतीचे महत्व

या आरतीचे महत्त्व हे खंडेरायाची पूजा आणि भक्तिभावाशी संबंधित आहे. ही आरती देवाला प्रार्थना करण्यासाठी आणि त्याच्या कृपेचा अनुभव घेण्यासाठी गायली जाते. “भवतम संहारुनिया दाखवि निजमाया” या ओळीचा अर्थ ‘संसाररूपी अंधार (भवतम) नष्ट करून तू तुझे निजस्वरूप (माया) दाखव’ असा होतो. खंडेराया हे अनेकांचे कुलदैवत असल्यामुळे, विशेषतः चंपाषष्ठीसारख्या सणांच्या दिवशी, या आरतीला मोठे महत्त्व आहे. 

खंडेरायाची आरती

जयदेव जयदेव जय खंडेराया ।
भवतम संहारुनिया दाखवि निजमाया ॥धृ॥

शिवशंकर गौरीवर हर करुणाकर ।
निजभक्ताच्या साठीं घेउनि अवतार
भूलोकाच्या ठायीं येवुनि सत्वर ।
मणि – मल्हादिक दैत्या केला संहार ॥1॥

सर्वांगातें लावुनि भंडार पिवळा ।
कंठीं भूषण शोभे रुद्राक्षमाळा ।
सह्याद्रीचे वरुते बैसुनि अवलीळा ।
हरहर वदनीं बोलतसे वेळोवेळां ॥2॥

वसवोनिया बहुसुंदर सुस्थळ जेजोरी ।
महाळसा शोभतसे वामांकावरी ।
रघुविर – प्रिय अवतार तो हा मल्हारी ।
ह्मणवुनि निरंजन गुण गातो बहुपरी ॥3॥

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)

ताज्या बातम्या