Khandobachi Navratri 2025 : खंडोबाची नवरात्र कधी सुरु होणार? जाणून घ्या…

चंपाषष्ठी हा उत्सव नवरात्रोत्सवाप्रमाणेच असून, अनेक कुटुंबांसाठी हा कुलदेवतेचा सण आहे आणि घरोघरी कुळाचार केला जातो.

२१ नोव्हेंबरपासून ‘मल्हारी मार्तंड भैरव’ म्हणजेच खंडोबाच्या ‘चंपाषष्ठी नवरात्रोत्सवा’ला सुरुवात होणार आहे. या उत्सवात खंडोबाची पूजा केली जाते आणि चंपाषष्ठीला त्याचे विसर्जन होते.

चंपाषष्ठी कधी आहे?

पंचांगानुसार, मार्गशीर्ष शुक्ल पक्षातील षष्ठी तिथी म्हणजेच चंपषष्ठी तिथी 25 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री 10 वाजून 56 मिनिटांनी सुरू होईल. आणि 27 नोव्हेंबर 2025 रोजी पहाटे 12 वाजून 01 मिनिटांनी समाप्त होईल. उदयतिथीनुसार, चंपाषष्ठी 26 नोव्हेंबर 2025 रोजी साजरी होईल.

सहा दिवसांची नवरात्र

मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून ते षष्ठीपर्यंत चंपाषष्ठीचा सहा दिवसांचा उत्सव साजरा केला जातो, ज्याला “खंडोबाचे नवरात्र” किंवा “मल्हारी मार्तंड भैरव षडरात्रोत्सव” असेही म्हणतात. हे उत्सव जेजुरीसारख्या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरे होतात, जिथे बहुतांश लोकांचे कुलदैवत असलेल्या खंडोबाची पूजा केली जाते. 

चंपाषष्ठीचे महत्त्व

या दिवशी भगवान शंकराने मार्तंड भैरव रूप घेऊन मणी-मल्ल या राक्षसांचा सहा दिवसांच्या युद्धात पराभव केला, या घटनेचे स्मरण म्हणून हा दिवस साजरा केला जातो. मार्गशीर्ष महिन्यातील षष्ठी तिथीला होणारा हा उत्सव, अनेक ठिकाणी खंडोबा नवरात्र म्हणूनही साजरा केला जातो. या काळात भक्त मार्तंड देवाचे रूप असलेल्या खंडोबाची पूजा करतात आणि अनेक दिवस नऊ तेलाचे दिवे लावून आरती करतात. या उत्सवातील एक महत्त्वाचा विधी म्हणजे ‘तळी भरणे’ होय, ज्यामध्ये भक्त ‘येळकोट येळकोट जय मल्हार’चा जयघोष करतात. 

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News