दर महिन्याच्या मासिक दुर्गाष्टमीला दुर्गा देवीची मनोभावे पूजा केली जाते. या महिन्याची दुर्गाष्टमी 28 नोव्हेंबर 2025 रोजी साजरी केली जाणार आहे. या अष्टमीला अग्रहायण महिन्यातील दुर्गाष्टमी म्हणूनही ओळखले जाते. मासिक दुर्गाष्टमीला देवी दुर्गेची पूजा केल्याने सर्व संकटांपासून मुक्ती मिळते आणि जीवनात सुख-समृद्धी, सकारात्मक ऊर्जा आणि शक्ती येते. या दिवशी उपवास करणे, दुर्गा मातेची विधिवत पूजा करणे, मंत्र जप करणे आणि दानधर्म करणे फायदेशीर ठरते. यामुळे मनोकामना पूर्ण होतात आणि आत्मविश्वास वाढतो.
अग्रहायण दुर्गाष्टमीच्या तिथीची सुरूवात
हिंदू पंचांगानुसार मार्गशीर्ष महिन्यातील शुक्लाष्टमी तिथी 28 नोव्हेंबर रोजी रात्री 12 वाजून 29 मिनिटांनी सुरू होईल. आणि दुसऱ्या दिवशी 29 नोव्हेंबर रोजी रात्री 12 वाजून 15 मिनिटांनी समाप्त होईल. दुर्गीष्टमीचा हा मुहूर्त 28 तारखेचा दिवस संपल्यानंतर सुरू होत असला तरीही, दुर्गा देवीची पूजा रात्री करण्याला जास्त महत्त्व दिले जाते. त्यामुळे 28 नोव्हेंबरचा दिवसच अग्रहायण दुर्गाष्टमीचा दिवस मानला जाईल.

अग्रहायण दुर्गाष्टमीचे महत्त्व
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)











