Panchmukhi Hanuman : पंचमुखी हनुमानाचा फोटो घरात लावल्याने काय होते ? जाणून घ्या…

हनुमानजी आपल्या भक्तांचे सर्व संकट दूर करतात. यामुळेच त्याला संकट मोचन म्हणतात. हनुमानाची पूजा केल्याने सर्व प्रकारच्या संकटांपासून मुक्ती मिळते.

हनुमानजी आपल्या भक्तांचे सर्व संकट दूर करतात. यामुळेच त्याला संकट मोचन म्हणतात. हनुमानाची पूजा केल्याने सर्व प्रकारच्या संकटांपासून मुक्ती मिळते. शास्त्रानुसार घरामध्ये भगवान हनुमानाचे पंचमुखी चित्र लावल्याने घरातील प्रत्येक व्यक्तीची समस्या दूर होते.  पंचमुखी हनुमानाचा फोटो कोणत्या दिशेला लावावा? जाणून घेऊयात…

पंचमुखी हनुमानाचा फोटो घरात लावल्याने काय होते ? 

घरात पंचमुखी हनुमानाचा फोटो लावल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते, घरातील नकारात्मकता आणि भीती दूर होते आणि सर्व संकटे दूर होतात असे मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार, दक्षिण दिशेला पंचमुखी हनुमानाचा फोटो लावल्याने नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करू शकत नाही आणि नकारात्मक प्रभाव नष्ट होतो. घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि घरात सुख-समृद्धी टिकून राहते. हनुमानाच्या कृपेने जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि अपार यश मिळते. दक्षिण दिशा यमाची दिशा मानली जाते. त्यामुळे या दिशेला फोटो लावल्याने भीती दूर होते आणि घरातून नकारात्मकता दूर राहते. स्वयंपाकघर, पायऱ्यांखाली किंवा अस्वच्छ ठिकाणी फोटो लावू नये. 

पंचमुखी हनुमानाचा फोटो कोणत्या दिशेला लावावा?

पंचमुखी हनुमानाचा फोटो लावताना तो योग्य दिशेला लावणे गरजेचे आहे. पचमुखी हनुमानाचा फोटो घराच्या प्रवेशद्वारावर लावणे शुभ मानले जाते.घराच्या प्रवेशद्वारावर हनुमानाचा फोटो लावल्याने नकारात्मक ऊर्जा आणि वाईट प्रभावांपासून घरात सुरक्षितता मिळते. वास्तूशास्त्रानुसार पंचमुखी हनुमानाचा फोटो दक्षिण दिशेला लावणे शुभ मानले जाते. या दिशेला लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि भीती नाहीशी होते.

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News