Mahaparinirvan Din 2025 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन!

Asavari Khedekar Burumbadkar

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिदिनी म्हणजेच महापरिनिर्वाण दिनी त्यांना आदरांजली वाहण्यासाठी देशभरात त्यांचे अनुयायी मुंबईतील चैत्यभूमीमध्ये दाखल होतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त खास संदेश शेअर करून महामानवाच्या स्मृतींना अभिवादन करू शकता..

महापरिनिर्वाण दिन

महापरिनिर्वाण दिन हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन असून तो ६ डिसेंबर रोजी आयोजित केला जातो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्ली येथे महापरिनिर्वाण (निधन) झाले होते, याच्या दुसऱ्या दिवशी ७ डिसेंबर रोजी मुंबईतील चैत्यभूमी येथे त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंतिमसंस्कार करण्यात आले. त्यामुळे दरवर्षी ६ डिसेंबरला जगातून, तसेच देशभरातून मोठ्या संख्येने अनुयायी चैत्यभूमीवर एकत्र येतात आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन करतात.

‘महापरिनिर्वाण’ म्हणजे ‘महानिर्वाण’ किंवा ‘मृत्यूनंतरची मुक्ती’, आणि हा दिवस डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ६ डिसेंबर १९५६ रोजी झालेल्या महापरिनिर्वाणाचे स्मरण करतो, जो सामाजिक न्याय, समानता आणि त्यांच्या शिकवणींचा वारसा पुढे नेण्याचा दिवस आहे, जिथे अनुयायी त्यांच्या योगदानाला वंदन करतात आणि समानतेसाठी लढण्याची शपथ घेतात.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानवाला करा विनम्र अभिवादन

विश्वरत्न, भारतरत्न, प्रज्ञासूत्र, क्रांतिसूर्य
भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव
बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना
महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन!

एक उत्तम कलाप्रेमी, शिक्षणप्रेमी,
गुणवंत, बुद्धिमान असे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना
महापरिनिर्वाण दिनी कोटी कोटी प्रणाम!

देशात एकता, समता, बंधुता नांदावी
म्हणून आयुष्यभर झटणाऱ्या महामानवाला
महापरिनिर्वाण दिनानिमित्त कोटी कोटी प्रणाम!!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन!

सागराचे पाणी कधी आटणार नाही, भीमाची आठवण कधी मिटणार नाही,
एकच जन्म काय हजार जन्म घेतले तरी बाबासाहेबांचे उपकार कधी फिटणार नाहीत…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी विनम्र अभिवादन!

देशात एकता, समता, बंधुता नांदावी
म्हणून आयुष्यभर झटणाऱ्या महामानवाला
महापरिनिर्वाण दिनानिमित्त कोटी कोटी प्रणाम!

विश्वरत्न, भारतरत्न, प्रज्ञासूत्र, क्रांतिसूर्य,
भारतीय घटनेचे शिल्पकार,
महामानव, परमपूज्य, बोधिसत्त्व
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना
महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन!

आपल्या देशासाठी आणि समाजासाठी अहोरात्र कार्य करणाऱ्या
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन!

एक उत्तम कलाप्रेमी, शिक्षणप्रेमी,
गुणवंत, बुद्धिमान असे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेल्या
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी कोटी कोटी प्रणाम!

माणसाला माणूसपण दाखवणाऱ्या महामानवाला
महापरिनिर्वाण दिनी कोटी कोटी प्रणाम!

भारताला प्रगतीशील आणि लोकशाहीयुक्त संविधान देणारे भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन!

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)

ताज्या बातम्या