मार्गशिष महिन्याच्या गुरूवारी अनेकजण महालक्ष्मीचे उपवास करतात. काहींना उपवास करणं जमत नाही. पण देवासमोर नैवेद्य ठेवण्यासाठी काहीतरी गोड पदार्थ तयार केला जातो. चला तर मग घरच्या घरी पटकन तयार होणारी नैवेद्य रेसेपी पाहूयात. आज आपण मार्गशीष गुरुवारच्या नैवेद्यासाठी मुगडाळ हलवा कसा बनवायचा हे पाहणार आहोत.
साहित्य
- मुगडाळ
- तूप
- साखर
- दूध
- वेलची पूड
- सुका मेवा (पर्यायी)
कृती
- मूगाची डाळ चार ते पाच तास पाण्यात भिजत घाला.
- डाळ भिजल्यावर चाळणीत उपसून निथळत ठेवा.
- डाळीतील पाणी पूर्ण निघून गेल्यावर डाळ बारीक वाटून घ्या.
- एका कढईत तूप गरम करून त्यात वाटलेली मूगाची डाळ घाला आणि मंद आचेवर गुलाबी रंग येईपर्यंत भाजा. भाजत आली की तूप सुटू लागते.
- दुसरीकडे एका पातेल्यात दूध उकळून घ्या आणि खमंग भाजलेल्या डाळीत हळूहळू दूध घालून गुठळ्या न होऊ देता मंद आचेवर शिजवा.
- आळत आले की साखर घालून चांगले परता. हलवा घट्ट होईपर्यंत शिजवा.
- त्यात वेलची पूड, बेदाणे, बदामाचे काप घालू शकता.
- हा हलवा मार्गशीर्ष गुरुवारच्या पूजेसाठी देवीला नैवेद्य म्हणून अर्पण करा.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)












