मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला मोक्षदा एकादशी म्हणतात. यंदा ही एकादशीची तिथी १ डिसेंबरला असणार आहे. या दिवशी भगवान विष्णूची पूजा आणि उपासना केल्याने अनेक मनोकामना पूर्ण होतात. मोक्षदा एकादशीला विष्णूची पूजा केली जाते आणि उपवास करणाऱ्यांना वैकुंठाचे दरवाजे उघडलेले दिसतील. त्यांना मृत्युनंतर मोक्ष मिळतो.
मोक्षदा एकादशीचे महत्त्व
‘मोक्षदा’ या नावाचा अर्थ ‘मोक्ष देणारा’ असा होतो. या एकादशीचे उपवास आणि पूजा केल्याने व्यक्तीला सांसारिक आसक्तींच्या बंधनातून मुक्तता मिळते आणि मोक्षाचे दार उघडते. या व्रतामुळे सर्व पापांचा नाश होतो. हे व्रत करणाऱ्यांच्या पूर्वजांनाही मोक्ष मिळतो, अशी मान्यता आहे. विष्णु पुराणानुसार, मोक्षदा एकादशीचे व्रत केल्याने वैकुंठ धाममध्ये स्थान मिळते, असे भगवान श्रीकृष्णाने स्वतः अर्जुनाला सांगितले होते.
