Mokshada Ekadashi 2025 : मोक्षदा एकादशीनिमित्त उपवासाला बनवा रताळ्याचे वेफर्स, पाहा रेसिपी..

आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये रताळ्याचे वेफर्स बनवण्याची सोपी कृती सांगणार आहोत. हा पदार्थ लगेच तयार होतो. चला तर जाणून घेऊया रताळ्याचे वेफर्स बनवण्याची सोपी कृती.

उपवासाच्या दिवशी कायमच साबुदाणा खिचडी खाण्याऐवजी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये रताळ्याचे वेफर्स बनवू शकता. हा पदार्थ लगेच तयार होतो. जाणून घ्या रताळ्याचे वेफर्स बनवण्याची रेसिपी…

साहित्य

  • रताळी
  • तेल
  • साखर
  • हळद
  • लाल तिखट
  • आमचूर पावडर
  • मीठ

कृती

  • रताळ्यांपासून वेफर्स बनवण्यासाठी सर्वप्रथम, रताळी काहीवेळ पाण्यात भिजत ठेवा. यामुळे भाजीवरील माती निघून जाईल.
  • रताळी स्वच्छ धुवून घ्या आणि त्याचे साल काढा. त्यानंतर रताळ्याचे पातळ आणि गोलाकार काप करा.
  • कापलेले काप स्वच्छ सुती कापडावर पसरवून उन्हात चांगले सुकवा.
  • यामुळे कापलेल्या रताळ्यांमधील पाणी निघून जाईल.
  • एका भांड्यात रताळे घेऊन त्यात मीठ, साखर, हळद, लाल तिखट, आमचूर पावडर घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • एका कढईत तेल गरम करा. तेल गरम झाल्यावर, रताळ्याच्या चकत्या कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.  तयार आहेत सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले रताळ्याचे वेफर्स.

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News