उपवासाच्या दिवशी कायमच साबुदाणा खिचडी खाण्याऐवजी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये रताळ्याचे वेफर्स बनवू शकता. हा पदार्थ लगेच तयार होतो. जाणून घ्या रताळ्याचे वेफर्स बनवण्याची रेसिपी…
साहित्य
- रताळी
- तेल
- साखर
- हळद
- लाल तिखट
- आमचूर पावडर
- मीठ
कृती
- रताळ्यांपासून वेफर्स बनवण्यासाठी सर्वप्रथम, रताळी काहीवेळ पाण्यात भिजत ठेवा. यामुळे भाजीवरील माती निघून जाईल.
- रताळी स्वच्छ धुवून घ्या आणि त्याचे साल काढा. त्यानंतर रताळ्याचे पातळ आणि गोलाकार काप करा.
- कापलेले काप स्वच्छ सुती कापडावर पसरवून उन्हात चांगले सुकवा.
- यामुळे कापलेल्या रताळ्यांमधील पाणी निघून जाईल.
- एका भांड्यात रताळे घेऊन त्यात मीठ, साखर, हळद, लाल तिखट, आमचूर पावडर घालून व्यवस्थित मिक्स करा.
- एका कढईत तेल गरम करा. तेल गरम झाल्यावर, रताळ्याच्या चकत्या कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या. तयार आहेत सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले रताळ्याचे वेफर्स.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)
