Vastu Tips : घरात ‘या’ ठिकाणी बसून कधीही जेवण करू नये; अन्यथा…

Asavari Khedekar Burumbadkar

अनेक जण जेवताना काही छोट्या -छोट्या चुका करतात, वास्तुशास्त्रानुसार त्याचा मोठा परिणाम हा तुमच्या आयुष्यावर पडू शकतो. वास्तुशास्त्रानुसार अशा काही जागा असतात, त्या ठिकाणी बसून जेवण केल्यास घरात गरिबी येते. जेवताना योग्य दिशा आणि ठिकाण निवडणे महत्त्वाचे आहे. चुकीच्या ठिकाणी बसून जेवल्यास घरात दारिद्र्य, अडथळे आणि आर्थिक समस्या येऊ शकतात, तर योग्य दिशेला बसल्यास घरात लक्ष्मीचा वास राहतो आणि सकारात्मक ऊर्जा टिकून राहते.

दाराजवळ जेवू नका

वास्तुशास्त्रानुसार दाराजवळ बसून जेवण करणे अशुभ मानले जाते, ज्यामुळे घरात लक्ष्मीचा वास राहत नाही, असे सांगितले जाते.  दाराजवळ बसून जेवल्याने घरात लक्ष्मी येत नाही आणि आर्थिक नुकसान होते.

देवघराजवळ बसून खाऊ नका 

देवघराच्या पवित्र जागेजवळ जेवण करणे टाळावे, कारण तिथे अन्न खाल्ल्याने नकारात्मक परिणाम होऊ शकतात आणि घरात गरिबी येऊ शकते.

बेडरूममध्ये बसून जेऊ नये 

वास्तुशास्त्रानुसार, बेडरूममध्ये (अंथरुणावर) बसून जेवण करणे टाळावे, कारण यामुळे झोपेच्या सवयींवर आणि मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. तसेच बेडरूम झोपेसाठीच वापरावी, आणि पलंगावर जेवण केल्यास खाण्याचे कण पडू शकतात, स्वच्छता राखणे कठीण होते व आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. यामुळे आरोग्य बिघडू शकते आणि घरात सुख-शांती राहत नाही.

दक्षिण दिशा

वास्तुशास्त्रानुसार, दक्षिण दिशेला तोंड करून जेवण करणे टाळा. ही दिशा यमाची मानली जाते, त्यामुळे इथे बसून जेवल्यास जीवनात आव्हाने येतात.

जेवण कुठे करावं?

वास्तुशास्त्रानुसार जेवण हे नेहमी स्वयंपाक घरातच करावं, जेवण करण्यापूर्वी तुमच्या आराध्य देवाचं नामस्मरण करा, त्यामुळे जेवताना सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. तसेच तुमच्या दैनंदिन जीवनात येणारे अडथळे सुद्धा दूर होतील असं वास्तूशास्त्र सांगतं.

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)

ताज्या बातम्या