Vastu Tips : घरात येणाऱ्या लाल-काळ्या मुंग्या देतात शुभ अशुभ संकेत; जाणून घ्या

मुंग्या दोन प्रकारच्या असतात. एक काळ्या आणि दुसऱ्या लाल. घरातील या दोन मुंग्यांचे बाहेर पडणे वेगवेगळ्या प्रकारचे संकेत दर्शवते.जाणून घेऊयात...

घरात मुंग्या दिसणे ही एक सामान्य गोष्ट आहे, त्यामुळे अनेकदा आपण सामान्य घटना म्हणून याकडे दुर्लक्ष करतो. परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की या मुंग्या शुभ आणि अशुभ घटनाही सांगतात. जाणून घेऊयात…

काळ्या मुंग्याचे संकेत 

काळ्या मुंग्या घरात येणे हे आर्थिक लाभ आणि धनप्राप्तीचे लक्षण मानले जाते. या मुंग्या घरात सुख-समृद्धी आणतात आणि विष्णू देवाचा वास त्यांच्यात असतो, अशी श्रद्धा आहे. आयुष्यात चांगले आणि फायदेशीर बदल घडतात.  जर काळ्या मुंग्या तांदळाच्या भांड्यातून निघत असतील, तर हे धनवृद्धीचे शुभ चिन्ह आहे. घरात काळ्या मुंग्या दिसणे हे सुख-समृद्धी आणि चांगल्या बदलांचे संकेत देते. काळ्या मुंग्यांचा प्रवेश आयुष्यात नवीन आणि फायदेशीर संधी आणू शकतो. 

लाल मुंग्याचे संकेत 

घरामध्ये लाल मुंग्या बाहेर पडणे अशुभ मानले जाते. लाल मुंग्या येणे हे आर्थिक नुकसानीचे, अपेक्षेपेक्षा जास्त खर्च होण्याचे लक्षण असू शकते. कुटुंबात वाद किंवा मानसिक तणाव वाढू शकतो, असे मानले जाते. लाल मुंग्यांचे येणे हे आर्थिक नुकसान, कुटुंबात वाद, भांडणे किंवा मानसिक तणावाचे लक्षण असू शकते.

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News