Shree Ganesh Geeta : श्री गणेश गीता पठणाचे महत्त्व…

Asavari Khedekar Burumbadkar

श्री गणेश गीता पठणाचे महत्त्व हे गणपतीला प्रसन्न करण्यासाठी आणि अडथळे दूर करण्यासाठी आहे. श्री गणेश गीता ही भगवद्गीतेवर आधारित आहे आणि यात गणपतींनी राजा वरेण्याला दिलेले ज्ञान आहे. गणपती अथर्वशीर्ष पठणाचेही विशेष महत्त्व आहे, ज्यामुळे सर्व सिद्धी प्राप्त होतात.

श्री गणेश गीता पठणाचे महत्त्व

श्री गणेश गीता हे गणपतींच्या शिकवणुकीचे सार आहे, जे राजा वरेण्याला देण्यात आले होते. गणेश ही विद्येची आणि संकटांचे निवारण करणारी देवता आहे, त्यामुळे तिच्या स्तुतीने आणि पठणाने कार्यांमधील अडथळे दूर होतात.

श्री गणेशगीता

(ओवी)
श्रीगजाननाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥
श्रीगुरुभ्यो नमः ॥ श्रीमातापितृ० ॥
व्यास म्हणे ब्रह्मदेवा । जनसमूह पावन व्हावा ।
ऐसा उपाय सांगावा । विज्ञति हे परिसावी ॥१॥
विधी म्हणे ऐकें व्यासा । वरेण्य राजा भक्त ऐसा ।
दुजा न दिसे त्रिजगीं सा । गजाननासी तेधवां ॥२॥
पूर्वापर संक्षिप्त इतिहास । श्रवण करीं स्थिर मानस ।
इष्टफल साधावयास । सुलभ असे सर्वांसी ॥३॥
पूर्वीं महिष्मती पुण्यनगर । तेथें वरेण्य नृपवर ।
पुष्पिता राणी पतितत्पर । असे सुंदर रंभेपरी ॥४॥
संतान नाहीं तयांसी । शिवें जाणून मानसीं ।
निद्रित असतां राणी निशीं । कुशीं ठेववी स्वपुत्र ॥५॥
गजापरी नासीक कर्ण । चतुर हस्त इभवर्ण ।
विचित्र बालक परिपूर्ण । म्हणून त्यजिलें सरित्तीरीं ॥६॥
पराशर जातां सरित्तीरीं । बालक पाहून घेतलें करीं ।
आणून दिधलें कांते सत्वरीं । संतान लाधलें म्हणोनी ॥७॥
आनंदें लावी स्तनीं कुमारा । पय वाहे बत्तीस धारा ।
प्राशी गजानन सरसरा । तृप्त झाला निजांतरीं ॥८॥
पराशर पत्‍नी उभयतां । लालनपालन करिती सूता ॥
पुत्रस्नेहें जाणोन तत्त्वतां । सांभाळिती आनंदें ॥९॥
कांहीं काल तेथें क्रमितां । बालक बोले उभयतां ।
आज्ञा द्यावी कार्याकरितां । शुभाशीर्वादपूर्वक ॥१०॥
पहिलें कार्य सिंधूरहनन । दुजें वरेण्यदर्शन ।
दोनी कार्यें करोन । धरामर तोषवी ॥११॥
वरेण्यास अभय देऊन । उपदेश तया करुन ।
उद्धारुन सायुज्य सदन । द्यावें तया त्वरित पैं ॥१२॥
वरेणोपदेश पावन । गणेश गीता तया नाम ।
विख्यात त्रिजगीं होऊन । मुक्त करी साधकां ॥१३॥
वरेण्य गणेश संवादास । सविस्तर कथी कव्यासांस ।
त्यास तें कथी सूतास । गणेशपुराणीं प्रख्यात ॥१४॥
सूत कथिती शौनकादिकां । गणेशपुराणींचे भाग ऐका ॥
सविस्तृत करुन सकळिकां । श्रवणपठण याअर्थी ॥१५॥
गणेशगीतेचें अध्ययन । करुन स्वयें अध्यापन ।
गणेशभजनीं लावावें मन । कार्य योजिलें स्वयंस्फूर्ती ॥१६॥
गणेशपुराणीं गीतें वाचून । तें खंड दिसे मजलागुन ।
केलें असे पद्यमय कथन । अखंड करावें हा अर्थ ॥१७॥
महान्‌ महान्‌ कवीश्वर । त्यांत काय हा पामर ।
वर्णील कायसा चतुर । तें सज्जनीं जाणावें ॥१८॥
गजाननभक्ति आवडी । धरुन काव्यें करी कोडी ।
वेडींवाकुडीं अशीं रुपडीं । लवड सवडी रचितसे ॥१९॥
सज्जन चतुर पंडित । हंसक्षीरन्यायें सेवोत ।
प्रार्थीतसे तयांप्रत । नमन करोन यथामति ॥२०॥
बलभीम नामें पायपोस । गजाननचरणींचा खास ।
काव्यसुमनें पूजनास । भाषोद्यानीं आणीतसे ॥२१॥
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)

ताज्या बातम्या