Mahalakshmi Stotra : आज शुक्रवार, वाचा श्री महालक्ष्मी स्तोत्र आणि त्याचे महत्त्व…

Asavari Khedekar Burumbadkar

श्री महालक्ष्मी स्तोत्र हे समृद्धी, सौभाग्य आणि सर्व संकटांमधून मुक्ती मिळवण्यासाठी अत्यंत प्रभावी मानले जाते. हे स्तोत्र दररोज किंवा विशेषतः शुक्रवारी पठण केल्याने घरात धन-धान्याची वृद्धी होते आणि व्यक्तीला आरोग्य, ज्ञान, ऐश्वर्य आणि वैभव प्राप्त होते. या स्तोत्रामुळे आर्थिक संकटे दूर होतात आणि देवी लक्ष्मी प्रसन्न होते, अशी श्रद्धा आहे.

श्री महालक्ष्मी स्तोत्राचे महत्त्व

श्री महालक्ष्मी स्तोत्राचे महत्त्व हे धन, सौभाग्य, आरोग्य, ऐश्वर्य, ज्ञान आणि तेज प्राप्त होते. इंद्राने रचलेल्या या स्तोत्राचे पठण केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि भक्तांच्या जीवनातील आर्थिक आणि इतर समस्या दूर होतात. स्तोत्राच्या पठणाने घरात धन आणि समृद्धी येते आणि आर्थिक संकटे दूर होतात. हे स्तोत्र सौभाग्य, ऐश्वर्य, नम्रता आणि तेज प्राप्त करून देते. देवी महालक्ष्मीची कृपा प्राप्त होते, ज्यामुळे घरात सुख-शांती नांदते.

श्री महालक्ष्मी स्तोत्र

इंद्र उवाच
नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपुजिते ।
शंखचक्रगदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तु ते।।1।।
नमस्कार गरुडरुधे कोलासुरभयंकारी.
सर्वपापहरे देवी महालक्ष्मी नमोस्तु ते ।।2।।
सर्वज्ञ सर्ववरदे देवी सर्वदुष्टभयंकारी ।
सर्वदुःखहरे  देवी महालक्ष्मी नमोस्तु ते।।3।।
सिद्धिबुद्धिप्रदे देवी भुक्तिमुक्तिप्रदिनी ।
मन्त्रमूर्ते सदा देवि महालक्ष्मि नमोऽस्तुते।।4।।
आद्यंतार्हिते देवी आद्यशक्तीमहेश्वरी ।
योगजे योगसंभूते महालक्ष्मी नमोस्तु ते।।5।।
स्थूल सूक्ष्म महारौद्रे महाशक्तिमहोदरे ।
महापापरे देवी महालक्ष्मी नमोस्तु ते।।6।।
पद्मासनस्थे देवी परब्रह्मस्वरूपिणी ।
परमेशी जगन्मातरमहालक्ष्मी नमोस्तु ते।।7।।
श्वेताम्बरधरे देवि नानालङ्कारभूषिते ।
जगत्स्थिते जगन्मातरमहालक्ष्मी नमोस्तु ते।।8।।
महालक्ष्म्याष्टकं स्तोत्रम्य: पठेद्भक्तिमान्नरः।
सर्वसिद्धिमवाप्नोति प्राप्नोति सर्वदा।।
एककाले पठेन्नित्यं महापापविनाशनम् ।
द्विकालं यः पठेन्नित्यं धनधान्यसमन्वितः।।10।।
त्रिकालं यः पठेन्नित्यं महाशत्रुविनाशनम् ।
महालक्ष्मीरभवेनित्यं प्रसन्न वरदा शुभा।।11।।
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)

ताज्या बातम्या