श्री लक्ष्मी द्वादशनाम स्तोत्र हे स्तोत्र देवी लक्ष्मीच्या १२ नावांचा उल्लेख करते आणि दररोज किंवा नित्य त्रिसंध्येला याचे पठण केल्याने सुख, समृद्धी, दीर्घायुष्य आणि आरोग्य प्राप्त होते असे मानले जाते.
श्री लक्ष्मी द्वादशनाम स्तोत्र पठणाचे महत्व
श्री लक्ष्मी द्वादशनाम स्तोत्र पठणाने आर्थिक अडचणी दूर होतात, घरात समृद्धी येते आणि दीर्घायुष्य लाभते. या स्तोत्राच्या नियमित पठणामुळे महालक्ष्मीची कृपादृष्टी प्राप्त होते आणि व्यक्तीला चांगले आरोग्य मिळते. स्तोत्राचे त्रिसंध्या (सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी) पठण केल्यास चांगले आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभते. या स्तोत्राच्या नियमित पठणामुळे देवी लक्ष्मीची प्रसन्नता मिळते आणि तिच्या कृपेचा वर्षाव होतो.
श्री लक्ष्मी द्वादशनाम स्तोत्र
ध्यानम्
कान्त्या काञ्चनसन्निभां हिमगिरिप्रख्यैः चतुर्भिगजैः
हस्तोत्क्षिप्तहिरण्मयाऽमृतघटैः आसिच्यमानां श्रियम् ।
बिभ्राणांवरमब्जयुग्ममभयं हस्तैः किरीटोज्ज्वलां
क्षौमाबद्धनितम्बबिम्बललितां वन्देऽरविन्दस्थिताम् ॥
त्रैलोक्यपूजितेदेवि ! कमले विष्णुवल्लभे !
यथा त्वमचला कृष्णेतथा भव मयि स्थिरा ॥
ईश्वरी कमला लक्ष्मीः चला भूतिर्हरिप्रिया ।
पद्मा पद्मालया सम्यक् उच्चैः श्रीः पद्मधारिणी ॥
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)












